सण From Wikipedia, the free encyclopedia
एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा किंवा मेळा असे म्हणतात.
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
लोक संपर्क वाढविणे हा जत्रेचा मुख्य उद्देश असतो. बऱ्याच ठिकाणी जत्रेमध्ये बोकड कापले जाते. एखाद्या देवाच्या नावाने लोकांना आमंत्रित करून त्यांना देवाचा प्रसाद म्हणून अन्न वाटले जाते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये अशी प्रथा आढळते. एका ठरविलेल्या दिवशी गावातील प्रत्येक कुटुंब आपापल्या पाहुण्यांना, मित्र मंडळींना आमंत्रित करून जेवू घालतात. त्या दिवशी गावामध्ये मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तमाशा हा त्यापैकीच एक असा मनोरंजनाचा प्रकार ग्रामीण भागामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये लोकसंपर्काच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी जत्रा ही एक अतिशय महत्त्वाची पद्धती आहे. अशा या जत्रेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व स्तरातील, सर्व जाती-धर्मातील समुदाय या जत्रेत मोठ्या आनंदाने सहभागी होताना दिसतात. या अशा जत्रेतून सामाजिक एकोपा जपला जातो. ह्या धार्मिक कारणां बरोबरच आर्थिक व व्यावहारिक उलाढालींसाठी सोयीचे केंद्र असते. (उदा. शहाद्या जवळील सारंगखेडच्या जत्रेतला घोडे बाजार कोट्यवधींच्या उलाढाली साठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. [1] [2]) काही गावामध्ये जत्रेच्या दिवशी लोकविधी म्हणून ' दशावतार ' हा लोक नाट्य प्रकार सादर करण्याची प्रथा असते.
काही अनिष्ठ प्रथांनी देशांतल्या बहुतेक जत्रांमध्ये शिरकाव केलेला आढळतो. उदा.
अंगणेवाडी जत्रा, जातेगाव मुखई कालभैरव जत्रा, श्रीनाथ म्हस्कोबा जत्रा वीर व कोडीत पुणे.महालक्ष्मी जत्रा, वज्रेश्वरी जत्रा. खंडोबा यात्रा माळेगाव जि.नांदेड ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.