चंद्र
पृथ्वीचा उपग्रह / From Wikipedia, the free encyclopedia
चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०० कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७६ कि.मी. आहे.[1] याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २% आहे तर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७% इतकी आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते.चंद्राने बऱ्याच वर्षांपासून पृथ्वीला लघुग्रहांपासून संरक्षण केले आहे.
हा लेख खगोलशास्त्रातील ग्रहांविषयी आहे याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चंद्र (निःसंदिग्धीकरण).
जलद तथ्य कक्षीय गुणधर्म, उपपृथ्वी: ...
कक्षीय गुणधर्म | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
उपपृथ्वी: | ३,६३,१०४ कि.मी. | |||||||||
अपपृथ्वी | ४,०५,६९६ कि.मी. | |||||||||
परिभ्रमण काळ: | २७.३२१५८२ दिवस | |||||||||
सिनॉडिक परिभ्रमण काळ: | २९.५३०५८८ दिवस | |||||||||
सरासरी कक्षीय वेग: | १,०२२ मी. प्रति सेकंद | |||||||||
कक्षेचा कल: | ५.१४५ ° | |||||||||
कोणाचा उपग्रह: | पृथ्वी | |||||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||||
सरासरी त्रिज्या: | १,७३७.१० कि.मी. | |||||||||
विषुववृत्तीय त्रिज्या: | १,७३८.१४ कि.मी. | |||||||||
धृवीय त्रिज्या: | १,७३५.९७ कि.मी. | |||||||||
फ्लॅटनिंग: | ०.००१२५ | |||||||||
परीघ: | १०,९२१ कि.मी. (विषुववृत्तावर) | |||||||||
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: | ३.७९३ × १०७ वर्ग कि.मी. ( पृथ्वीच्या ०.०७४ पट) | |||||||||
वस्तुमान: | २.१९५८ × १०१० घनमीटर | |||||||||
सरासरी घनता: | ३,३४६.४ कि.ग्रॅ प्रति घनमीटर | |||||||||
पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण (विषुववृत्ताजवळ): | १.६२२ मी. प्रति वर्ग सेकंद | |||||||||
मुक्तिवेग: | २.३८ कि.मी./सेकंद | |||||||||
सिडेरियल दिनमान: | २७.३२१५८२ दिवस | |||||||||
विषुववृत्तावरील परिवलनवेग: | ४.६२७ मी/सेकंद | |||||||||
आसाचा कल: | १.५४२४° | |||||||||
पृष्ठभागाचे तापमान: विषुववृत्तीय ८५° उत्तर |
| |||||||||
विशेषणे: | चांद्र |
बंद करा