गौरी देशपांडे
मराठी लेखिका / From Wikipedia, the free encyclopedia
गौरी देशपांडे (जन्म : ११ फेब्रुवारी १९४२; - १ मार्च २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार देशपांडे यांनी हाताळले.[1] मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. देशपांडेंच्या आई लेखिका, संशोधक इरावती कर्वे होत्या. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील होते. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे देशपांडेंचे यांचे काका होते.
जलद तथ्य गौरी देशपांडे, जन्म ...
गौरी देशपांडे | |
---|---|
जन्म | फेब्रुवारी ११, १९४२ |
मृत्यू | मार्च १, २००३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
विषय | व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीवादी साहित्य |
वडील | दिनकर उर्फ डी. डी. कर्वे |
आई | इरावती कर्वे |
बंद करा