१९६९ ते १९७४ पर्यंतचे इस्रायलचे पंतप्रधान From Wikipedia, the free encyclopedia
गोल्डा मायर (हिब्रू גּוֹלְדָּה מֵאִיר ; रोमन लिपी: Golda Meir), पूर्वाश्रमीच्या गोल्डा माबोविच (रशियन: Голда Мабович ; रोमन लिपी: Golda Mabovich), (३ मे, इ.स. १८९८ - ८ डिसेंबर, इ.स. १९७८) या शिक्षिका, किब्बुत्झ्निक व इस्रायेलच्या राज्याच्या चौथ्या पंतप्रधान होत्या. त्यांनी १७ मार्च, इ.स. १९६९ ते ३ जून, इ.स. १९७४ या कालखंडा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली.
गोल्डा मायर | |
इस्रायलचा पंतप्रधान | |
कार्यकाळ १७ मार्च १९६९ – ३ जून १९७४ | |
मागील | लेव्हि एश्कॉल |
---|---|
पुढील | यित्झाक राबिन |
जन्म | ३ मे, १८९८ क्यीव, रशियन साम्राज्य (आजचा युक्रेन) |
मृत्यू | ८ डिसेंबर, १९७८ (वय ८०) जेरुसलेम, इस्रायल |
धर्म | ज्यू |
रशियन साम्राज्यामधील क्यीव येथे जन्मलेल्या मायर ह्यांचे बालपण व शिक्षण अमेरिकेच्या मिलवॉकी शहरामध्ये झाले. तरुण वयापासूनच त्यांच्यामध्ये कट्टर ज्यू राष्ट्रीयत्वाची भावना होती. इ.स. १९१८ मध्ये लग्नानंतर त्या पॅलेस्टाइनमध्ये स्थानांतरित झाल्या. इस्रायलच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
इ.स. १९५६ ते १९६६ दरम्यान त्या इस्रायलच्या परराष्ट्रमंत्री होत्या. १९६९ साली लेव्हि एश्कॉलच्या मृत्यूनंतर मायर पंतप्रधानपदावर आल्या. त्या काळी पंतप्रधान बनलेल्या त्या जगातील केवळ तिसऱ्या महिला होत्या (सिरिमावो भंडारनायके व इंदिरा गांधी खालोखाल).
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.