गुढीपाडवा
हिंदू कालदर्शिकेचा पहिला दिवस आणि उत्सव / From Wikipedia, the free encyclopedia
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.[1] शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.[2][3]
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
गुढीपाडवा | |
---|---|
गुढीपाडव्यानिमित्त जाहीर मिरवणूक | |
अधिकृत नाव | गुढीपाडवा |
साजरा करणारे | मराठी, कोंकणी, कानडी आणि तेलुगू |
प्रकार | महाराष्ट्रीय |
उत्सव साजरा | १ दिवस |
सुरुवात | चैत्र शुद्ध प्रतिपदा |
दिनांक | मार्च / एप्रिल |
वारंवारता | वार्षिक |
यांच्याशी निगडीत | उगादी व इतर सण |