![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/6c/India_Kerala_location_map.svg/langmr-640px-India_Kerala_location_map.svg.png&w=640&q=50)
कोचुवेली रेल्वे स्थानक
From Wikipedia, the free encyclopedia
कोचुवेली हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधील एक रेल्वे टर्मिनस आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी २००५ साली कोचुवेली स्थानक उघडण्यात आले..[1] हे स्थानक शहराच्या उत्तर भागात स्थित असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वरील बाह्यवळण मार्ग येथून जवळ आहे. येथून कोकण रेल्वेमार्गे मुंबई, दिल्ली व उत्तरेकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात.
कोचुवेली കൊച്ചുവേളി തീവണ്ടി നിലയം भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | तिरुवनंतपुरम, केरळ |
गुणक | 8°30′34″N 76°53′50″E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ७ मी |
मार्ग | तिरुवनंतपुरम-कोल्लम-एर्नाकुलम मार्ग |
फलाट | ४ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. २००५ |
संकेत | KCVL |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण रेल्वे |
स्थान | |
|
या स्थानकाला पूर्वी द्वार आणि पश्चिमी द्वार अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. पूर्व बाजूला रेल्वे टर्मिनल आहे जिथून कोचुवेली स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या जातात. सध्या तेथून ११ लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस तर १ पॅसेंजर गाडी सुटते. कोचुवेली रेल्वे स्थानक प्रवाशांना भारतातील महत्त्वाच्या शहरांशी जोडते. बहुतेक गाड्या ज्या आता त्रिवेंद्रम सेंट्रल स्थानकावरून सुटतात (साबरी एक्सप्रेससह) त्या संपूर्ण काम झाल्यानंतर कोचुवेली स्थानकावरून सुटतील.[2] गर्दीच्या काळात येथून काही विशेष गाड्यासुद्धा सुटतात. येथून नवी दिल्ली, हैदराबाद, बिलासपुर, यशवंतपूर, दादर, नवी तिनसुकिया, संत्रागाची आणि चेन्नई साठी गाड्या सुटतात.[3] पश्चिम बाजूला जुने रेल्वे स्थानक आहे.