![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bc/KKH.png/640px-KKH.png&w=640&q=50)
काराकोरम महामार्ग
From Wikipedia, the free encyclopedia
काराकोरम महामार्ग हा जगातील सर्वाधिक उंचीवर बांधला गेलेला रस्ता आहे.[1] काराकोरम पर्वतरांगेतील अत्यंत दुर्गम भागातून वाट काढत हा रस्ता चीनच्या शिंच्यांग प्रांताला पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान ह्या स्वायत्त भागाशी जोडतो. याचे अधिकृत नाव पाकिस्तानात एन-३५ तर चीनमध्ये जी-३१४ आहे.
जलद तथ्य एन-३५ (पाकिस्तान), जी-३१४ (चीन), लांबी ...
एन-३५ (पाकिस्तान), जी-३१४ (चीन) | |
---|---|
![]() | |
लांबी | १,३०० किमी |
देश |
![]() ![]() |
सुरुवात | अबॉटाबाद, पाकिस्तान |
मुख्य शहरे | अबॉटाबाद - थाकोट - चिलास - गिलगिट - अलियाबाद - सुस्त, खुंजेराब घाट, काश्गर |
शेवट | अत्तारी |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
एन-५ |
राज्ये व प्रदेश |
पंजाब (पाकिस्तान) गिलगित-बाल्टिस्तान (पाकव्याप्त काश्मीर) शिंच्यांग (चीन) |
इतर नावे | काराकोरम महामार्ग |
बंद करा
काराकोरम घाट याच्याशी गल्लत करू नका.
या रस्त्यावरील सर्वोच्च बिंदू खुंजेराब घाटात ४,६९३ मी उंचीवर आहे.[2][3]