कांपेचे
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
कांपेचे (संपूर्ण नाव: कांपेचेचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Campeche)हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. युकातान द्वीपकल्पावर वसलेल्या कांपेचेच्या पश्चिमेस मेक्सिकोचे आखात (कांपेचेचे आखात), दक्षिणेस ग्वातेमाला व पूर्वेस बेलिझ तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. सान फ्रांसिस्को दे कांपेचे ही कांपेचेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
कांपेचे Campeche | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
कांपेचेचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | सान फ्रांसिस्को दे कांपेचे | ||
क्षेत्रफळ | ५७,९२४ चौ. किमी (२२,३६५ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ८,२२,४४१ | ||
घनता | १४ /चौ. किमी (३६ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-CAM | ||
संकेतस्थळ | http://www.campeche.gob.mx | ||
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या कांपेचेमध्ये माया संस्कृतीमधील अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.
मेक्सिकोच्या आग्नेय भागात ५७,९२४ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १८व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.