ओंगल गाय
भारतीय गोवंश / From Wikipedia, the free encyclopedia
ओंगल गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, याचे मूळ आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोल या गावातील आहे.[1] तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूत कधीकाळी ही प्रजाती खूप प्रसिद्ध होती. विशेषकरून जलीकट्टू या खेळासाठी या प्रजातीचे सांड वापरले जात असत. यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे आणि मजबूत अंगकाठीमुळे या प्रजातीचे बैल शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.[2]
नेल्लूर गाय याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य मूळ देश, आढळस्थान ...
ओंगल गाय | |
मूळ देश | भारत |
---|---|
आढळस्थान | पूर्व गोदावरी, गुंटुर, प्रकाशम किंवा ओंगोल, नेल्लोर तथा कुर्नूल जिल्हा |
मानक | agris IS |
उपयोग | दुहेरी हेतूचा गोवंश (शेतीकाम तथा दुधदुभते) |
वैशिष्ट्य | |
वजन |
|
उंची |
|
आयुर्मान | १८ ते २० वर्षे |
डोके | आखूड मान, मोठे त्रिकोणी डोके, भव्य कपाळ, मोठे टोकदार कान |
पाय | लांब, काटक आणि भरीव |
शेपटी | मध्यम, लांब काळा शेपूट गोंडा |
तळटिपा | |
भारतातून परदेशात सर्वात जास्त प्रसारित झालेला गोवंश | |
|
बंद करा