From Wikipedia, the free encyclopedia
उपमा हा गव्हाच्या किंवा तांदुळाच्या रव्यापासून तयार केला जाणारा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. दक्षिण भारतात होणाऱ्या उपम्यासारखाच ’फोडणीचा सांजा’ नावाचा खाद्यपदार्थ महाराष्ट्रात होतो. उपम्यात हळद नसते तर सांज्यात असते.
उपमा, उप्पुमावू किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन आणि श्रीलंकन तमिळ नाश्ता आहेत.[1] भाजलेला रवा किंवा तांदळाच्या भाजलेल्या पिठापासून हा शिऱ्यासारखा पदार्थ बनविला जातो. उपमा बनवितांना लोकांच्या आवडीनुसार त्यामध्ये काहीजण भाज्यासुद्धा मिसळतात.[2]
बऱ्याचश्या द्राविडी भाषांमध्ये उप्पू म्हणजे मीठ आणि पिंडी, मावू किंवा हित्तू म्हणजे पीठ असा होतो, म्हणून उप्पिंडी, उप्पुमावू किंवा उप्पीट.[3]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.