इल-दा-फ्रान्स
From Wikipedia, the free encyclopedia
इल-दा-फ्रान्स (फ्रेंच: Île-de-France; शब्दशः अर्थ: फ्रान्सचे बेट) हा फ्रान्स देशाच्या २२ प्रदेशांपैकी सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशात मुख्यतः राजधानी पॅरिस महानगर क्षेत्राचा समावेश होतो. सुमारे १.१७ कोटी लोकसंख्या असलेला इल-दा-फ्रान्स हा युरोपातील चौथ्या क्रमांकाचा मोठा प्रशासकीय विभाग आहे (इंग्लंड, नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन व बायर्न) खालोखाल. आर्थिक दृष्ट्या इल-दा-फ्रान्स जगातील चौथ्या तर युरोपातील अव्वल क्रमांकाचा धनाढ्य प्रदेश आहे. २००९ साली इल-दा-फ्रान्सचा जीडीपी ५५२ अब्ज युरो इतका होता.
जलद तथ्य
इल-दा-फ्रान्स Île-de-France | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
इल-दा-फ्रान्सचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | पॅरिस | ||
क्षेत्रफळ | १२,०१२ चौ. किमी (४,६३८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १,१६,९४,००० | ||
घनता | ९७३.५ /चौ. किमी (२,५२१ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-IDF | ||
संकेतस्थळ | http://www.iledefrance.fr | ||
बंद करा