आभासी दृश्यप्रत
From Wikipedia, the free encyclopedia
आभासी दृश्यप्रत (इंग्रजी: Apparent magnitude; चिन्ह m) ही खगोलीय वस्तूची पृथ्वीवरील निरीक्षकाला भासणारी प्रखरता/तेजस्विता दर्शवणारी संख्या आहे. ही संख्या जितकी लहान तितका तारा जास्त तेजस्वी दिसतो. -२७ आभासी दृश्यप्रत असलेला सूर्य आकाशातील सर्वात तेजस्वी वस्तू आहे. एखादी वस्तू जेवढी जास्त तेजस्वी असते, तिची दृश्यप्रत तेवढी कमी असते. त्याचबरोबर दृश्यप्रत मापणीची पद्धत लॉगॅरिदमिक असते: म्हणजे दृश्यप्रतीमधील एका एककाचा फरक म्हणजे प्रखरतेमध्ये इतक्या म्हणजे २.५१२ पटीचा फरक असतो.
सामान्यत: आभासी दृश्यप्रत सांगण्यासाठी दृश्य वर्णपटाचा आधार घेतला जातो. पण काही वेळा इतर वर्णपटही वापरले जातात (उदा. अवरक्त). दृश्य वर्णपटामध्ये सूर्यानंतर व्याध दुसरा सर्वात तेजस्वी तारा आहे. निकट अवरक्त मधील जे-बॅंडमध्ये काक्षी (भरत) तारा सर्वात तेजस्वी तारा आहे. ताऱ्यांची आभासी दृश्यप्रत बोलोमीटर या यंत्राने मोजतात.
पुढील तक्त्यामध्ये रात्रीच्या आकाशातील किती आभासी दृश्यप्रतीचे तारे उघड्या डोळ्यांनी दिसू शकतात किंवा नाहीत व त्यांची संख्या दिली आहे.
मानवी डोळ्यांना दिसते[1] | आभासी दृश्यप्रत | अभिजित ताऱ्याच्या तुलनेत तेजस्विता | रात्रीच्या आकाशात या आभासी दृश्यप्रतीपेक्षा तेजस्वी दिसणाऱ्या ताऱ्यांची संख्या[2] |
---|---|---|---|
होय | −१.० | २५०% | १ |
०.० | १००% | ४ | |
१.० | ४०% | १५ | |
२.० | १६% | ४८ | |
३.० | ६.३% | १७१ | |
४.० | २.५% | ५१३ | |
५.० | १.०% | १ ६०२ | |
६.० | ०.४०% | ४ ८०० | |
६.५ | ०.२५% | ९ ०९६ | |
नाही | ७.० | ०.१६% | १४ ००० |
८.० | ०.०६३% | ४२ ००० | |
९.० | ०.०२५% | १२१ ००० | |
१०.० | ०.०१०% | ३४० ००० |