आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश
From Wikipedia, the free encyclopedia
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश संस्थापक असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती १५ जून १९०९ रोजी लॉर्ड्स येथे इंपेरियल क्रिकेट परिषद म्हणून स्थापन झाली.[1] ह्या परिषदेमध्ये सुरुवातीला फक्त राष्ट्रकुलमधील देशांनाच सामिल होता येत होते.[2] ह्या सदस्यांनंतर १९२६ मध्ये भारत, न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज, आणि त्यानंतर १९५३ मध्ये पाकिस्तान सामील झाला.[3] १९६१ मध्ये, राष्ट्रकुलामधून बाहेर पडल्याने दक्षिण आफ्रिकेने सदस्यत्वाचा राजीनामा दिला.[3] १९६५ मध्ये इंपेरियल क्रिकेट परिषदेचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे करण्यात आले त्याचबरोबर पहिल्यांदाच नियमन मंडळात राष्ट्रकुलाच्या बाहेरील देशांच्या निवडीला मंजूरी देण्याबाबत नवीन नियम केले गेले.[2] नियमन मंडळामध्ये नव्याने निवड झालेला कोणताही सदस्य फक्त सहयोगी (असोसिएट) सदस्य म्हणून निवड केला जातो ज्याला पूर्ण सदस्य होण्याची संधी असते. फिजी आणि अमेरिका हे सर्वात पहिले सहयोगी सदस्य होते.[2] १९८९ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नाव पुन्हा एकदा बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती असे केले गेले.[2] १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा पूर्ण सदस्य म्हणून निवडला गेला आणि १९९२ मध्ये झिम्बाब्वेची निवड.[3] सर्वात अलिकडील पूर्ण सदस्य अफगाणिस्तान आणि आयर्लंड, २०१७ साली नियुक्त केला गेला.[3] सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीमध्ये एकूण १०५ सदस्य आहेत.
समितीच्या सदस्यत्वाचे तीन प्रकार आहेत: पूर्ण सदस्य, सहयोगी (असोसिएट) सदस्य, आणि संलग्न सदस्य.[2] सर्वात वरच्या श्रेणीमध्ये १० पूर्ण सदस्य आहेत. त्याखालोखाल ३९ सहयोगी सदस्य आणि सर्वात खालच्या श्रेणी मध्ये ५६ संलग्न सदस्य आहेत.