From Wikipedia, the free encyclopedia
सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[1] त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते. परंतु त्याचवेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जीज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलीन ही बुरशी जीवाणूंसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अलेक्झांडर फ्लेमिंग | |
---|---|
जन्म |
अलेक्झांडर फ्लेमिंग ६ ऑगस्ट इ.स. १८८१ लोकफेल्ड, स्कॉटलॅंड |
मृत्यू |
११ मार्च इ.स. १९५५ लंडन |
चिरविश्रांतिस्थान | सेंट पॉल कॅथेड्रल लंडन |
राष्ट्रीयत्व | स्कॉटिश |
शिक्षण | MBBS |
प्रशिक्षणसंस्था | इन्पेरिअल कॉलेज लंडन |
पेशा | वैद्यकीय |
प्रसिद्ध कामे | पेनिसिलिनचा शोध |
धर्म | ख्रिस्ती |
जोडीदार | सारा मारियान व आमेलिया |
वडील | हयुज फ्लेमिंग |
आई | ग्रेस |
पुरस्कार | नोबेल पारितोषिक इ.स. १९४५ |
स्वाक्षरी |
फ्लेमिंग यांनी जीवाणूशास्त्र, केमोथेरेपी यांवरती अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.