अभिमन्यू पवार
From Wikipedia, the free encyclopedia
अभिमन्यू दत्तात्रय पवार हे भारतीय जनता पक्षाचे एक भारतीय राजकारणी आहेत. ते चौदाव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.[1] त्यांनी लातूरच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयमधून वाणिज्य मध्ये पदवी पूर्ण केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कर्मचारी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली. ते २०१४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक सहाय्यक होते.[2] ते विशेष कर्तव्यावर अग्रणी अधिकारी (ओएसडी), वैयक्तिक सहाय्यक (पीए)[3] आणि लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे एक आघाडीचे व सुप्रसिद्ध सदस्य आहेत.
जलद तथ्य मागील, मतदारसंघ ...
अभिमन्यू दत्तात्रेय पवार | |
सदस्य, महाराष्ट्र विधान सभा | |
विद्यमान | |
पदग्रहण ८ नोव्हेंबर २०१९ | |
मागील | बस्वराज पाटील |
---|---|
मतदारसंघ | औसा |
जन्म | १ जुलै, १९७१ (1971-07-01) (वय: ५३) कासार शिर्शी, ता.निलंगा, जि.लातूर, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
वडील | दत्तात्रेय पवार |
अपत्ये | २ |
निवास | ता.औसा,जि.लातूर, महाराष्ट्र, भारत |
गुरुकुल | दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर (वाणिज्य पदवी), भारतीय व्यवस्थापन संशोधन संस्था पुणे (वैयक्तिक व्यवस्थापन पदव्यूत्तर) |
व्यवसाय | राजकारणी |
संकेतस्थळ | www |
बंद करा