अझोवचा समुद्र
पूर्व युरोपच्या दक्षिणेकडील काळ्या समुद्राशी दुवा साधलेला समुद्र / From Wikipedia, the free encyclopedia
अझोवचा समुद्र (रशियन: Азо́вское мо́ре; युक्रेनियन: Азо́вське мо́ре) हा पूर्व युरोपाच्या दक्षिण भागातील एक छोटा समुद्र आहे. कर्चच्या सामुद्रधुनीने हा समुद्र काळ्या समुद्रासोबत जोडला गेलेला आहे. अझोवच्या समुद्राच्या उत्तरेला युक्रेन, पूर्वेला रशिया तर पश्चिमेला क्राइमियन द्वीपकल्प आहेत.
किमान ०.९ मीटर व कमाल १४ मीटर खोल असलेला अझोवचा समुद्र जगातील सर्वात उथळ समुद्रांपैकी एक मानला जातो.[1][2][3][4]