From Wikipedia, the free encyclopedia
अग्नी हे एक ऋग्वेदिक कालापासूनचे हिंदू दैवत आहे.ते 'अग्नी'चे दैवत आहे[1]ही देवता आहूतीचा स्वीकार करते.त्यास दिलेल्या आहूती ह्या थेट देवांपर्यंत पोचतात कारण अग्नी हा दूत आहे.[2] तो तरुण आहे व सदैव तरुणच राहतो कारण अग्नी हा दर दिवशी नवीन प्रज्वलीत केल्या जातो.तो अमरही आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
या वैदिक देवतेस दोन मुखे आहेत.त्यापैकी एक अमरत्वाचे प्रतिनिधित्व करते तर दुसरे जीवनाचे.वरुण व इंद्राप्रमाणे ते ऋग्वेदातील एक परमोच्च दैवत आहे.तो पृथ्वी व स्वर्ग यामधील तसेच देव व मानवामधील एक दुवा आहे.
जातो यदग्रे भूतानां अग्रणी अध्वरे च यत् | नाम्ना संनयते वाङ्गं स्तुतो अग्निः इति सूरिभिः || बृहद्देवता २.२.४
सर्व भूतांच्या आधी जन्मलेला , यज्ञामध्ये अग्रणी आणि नावाने अंगाचे संनयन करणारा, म्हणून अग्नी अशी त्याची विद्वानांनी स्तुती केली आहे. द्यु, अंतरिक्ष, पृथ्वी ही तीन अग्नीची जन्मस्थाने आहेत.विस्तव हे अग्नीचे पार्थिव रूप होय.
संदर्भ- संस्क्रुति कोष
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.