कासव
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
कासव हा एक उभयचर प्राणी आहे. कासवांचे आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त असते. कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कासवाच्या शरीराचे शीर्ष, मान, धड आणि शेपूट असे चार प्रमुख भाग असतात.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
याला इंग्रजीत Tortoise म्हणतात. हे पोट आणि पाठ या दोन्ही बाजूंनी टणक असते. त्यामध्ये 1 टन वजन सहन करण्याची क्षमता असते याच्या बोटांमध्ये पडदे नसतात.
ही कासवे विहिरीत आणि नद्यांत राहतात. दीर्घायुषी असल्याने यांचा आकार खूप मोठा होऊ शकतो. इंग्रजीत यांना Sweet Water Turtle म्हणतात. ही कासवे जमिनीवरही राहू शकतात.
समुद्रात राहणाऱ्या कासवांना समुद्री अथवा सागरी कासव असे म्हणतात. ही कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यांतील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार जाती भारताच्या समुद्री किनाऱ्यावर आढळून येतात.
तेल गळतीसारखे अपघात, यांत्रिक मासेमारीच्या जाळ्यात अडकून मृत्यू, मानवाकडून किनारी भागांचा विध्वंस, कासवांच्या पाठींचा दागिन्यांसाठी वापर, अशा अनेक कारणामुळे समुद्री कासवांची संख्या कमी होते आहे. कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन अणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.
भारतीय संस्कृतीत कासवाला आध्यात्मिकदृष्ट्या विशेष स्थान आहे. हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. कासवाचा प्रतीकात्मक उपयोग आपल्याला साहित्य, चित्रकला, जातककथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो. भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव हेही असेच महत्त्वाचे मानले जाते.
हिंदू आख्यायिकांनुसार कूर्म अवतार हा विष्णूचा कासवरूपातील दुसरा अवतार समजला जातो. याला 'कच्छप अवतार' देखील म्हणतात. क्षीरसागर समुद्राच्या वेळी विष्णूने कूर्म अवतारात मंदार पर्वताला आधार दिला. अशाप्रकारे वासुकी नावाच्या सर्पाच्या मदतीने देवांनी आणि असुरांनी समुद्रमंथन करून चौदा रत्ने मिळवली.[1] कासव हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव महत्त्वाचे मानले जाते. त्याचा संकेत आहे की कासव जसे बाह्य गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपले पाय, शेपूट. मान कवचामध्ये ओढून घेते, तसे देवतेचे दर्शन घेताना काम, क्रोध, मद, मोह, मत्सर,लोभ या मानवी दुर्गुणांना आत खेचून घेऊन मगच देवतेचे दर्शन घ्यावे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.