मे २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४३ वा किंवा लीप वर्षात १४४ वा दिवस असतो. << मे २०२४ >> सो मं बु गु शु श र १२३४५६७ ८९१०१११२१३१४ १५१६१७१८१९२०२१ २२२३२४२५२६२७२८ २९३०३१ ठळक घटना आणि घडामोडी पंधरावे शतक १४३० - जोन ऑफ आर्कला बरगंडीच्या सैन्याने पकडले. १४९८ - गिरोलामो साव्होनारोलाला मृत्युदंड. सोळावे शतक १५५५ - पॉल चौथा पोपपदी. १५६८ - नेदरलॅंड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य. सतरावे शतक १६०९ - व्हर्जिनीयाचे दुसरे संविधान स्वीकृत. अठरावे शतक १७०१ - समुद्री चाचा कॅप्टन विल्यम किडला फाशी. १७८८ - दक्षिण कॅरोलिनाने अमेरिकेचे संविधान स्वीकारले. एकोणिसावे शतक १८०५ - नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक. १८१३ - व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसैनिक सिमोन बॉलिव्हारच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी मेरिदा शहर जिंकले. बॉलिव्हारला एल लिबर्तादोर (मुक्तिदाता) ही पदवी बहाल. १८४४ - सर्वप्रथम तार संदेश मोर्स कोडमध्ये पाठवण्यात आला. संदेश होता - व्हॉट हॅथ गॉड रॉट! (देवाने काय ठरवले आहे!). १८६३ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या आरमाराने लुईझियानाच्या पोर्ट हड्सन या बंदराला वेढा घातला. विसावे शतक १९११ - न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले. १९१५ - पहिले महायुद्ध - इटली दोस्त राष्ट्रांना सामील झाले. १९२३ - बेल्जियमच्या सबिना एरलाइन्सची स्थापना. १९३४ - अमेरिकन दरोडेखोर बॉनी पार्कर व क्लाईड बॅरो पोलिसांकडून ठार. १९३९ - चाचणीची सफर सुरू असताना अमेरिकेची पाणबुडी यु.एस.एस. स्क्वॉलस बुडाली. २६ खलाशी मृत्युमुखी. ३२ खलाशी, अधिकारी व १ प्रवाश्याला दुसऱ्या दिवशी वाचवण्यात आले. १९४५ - दुसरे महायुद्ध - नाझी अधिकारी हाइनरिक हिमलरने दोस्त राष्ट्रांच्या बंदिवासात आत्महत्या केली. १९४९ - पश्चिम जर्मनीचे राष्ट्र अस्तित्वात. १९५८ - अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला. १९७७ - नेदरलॅंड्समध्ये अतिरेक्यांनी रेल्वे गाडीतील प्रवाशांना धरले. अजून एका गटाने शाळेतील १०० विद्यार्थ्यांना धरले. १९८४ - बचेंद्री पाल या भारतीय महिलेचे एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी पदार्पण. १९९५ - जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा. १९९७ - मोहम्मद खातामी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी. एकविसावे शतक २००१ - एव्हरेस्ट शिखर प्रथमच भारतीय लष्कराच्या पथकाकडून सर. २००४ - पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळाचा काही भाग कोसळला. ५ ठार. ३ जखमी. जन्म १०५२ - फिलिप पहिला, फ्रांसचा राजा. ११०० - किन्झॉॅंग, चीनी सम्राट. १८४४ - अब्दुल बहा, बहाई धर्मगुरू. १८६५ - एपितासियो पेसोआ, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. १८९६ - केशवराव भोळे, मराठी संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, लेखक. १९१८ - डेनिस कॉम्प्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४५ - पद्मराजन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक. १९६३ - टोनी ग्रे, वेस्ट ईंडिझचा क्रिकेट खेळाडू. १९६५ - वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६६ - ग्रेम हिक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७० - यिगाल अमीर, इस्रायेलच्या पंतप्रधान यित्झाक राबिनचा मारेकरी. मृत्यू ११२५ - हेन्री पाचवा, पवित्र रोमन सम्राट. १४९८ - गिरोलामो साव्होनारोला, ख्रिश्चन धर्मप्रसारक व फ्लोरेन्सचा राजा. १५२३ - अशिकागा योशिताने, जपानी शोगन. १५२४ - इस्माईल पहिला, इराणचा शहा. १८५७ - ऑगस्टिन लुई कॉशि, फ्रेंच गणितज्ञ. १९०६ - हेन्रिक इब्सेन, नॉर्वेचा लेखक. १९३४ - बॉनी पार्कर, अमेरिकन दरोडेखोर. १९३४ - क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर. १९३७ - जॉन डी. रॉकफेलर, अमेरिकन उद्योगपती. १९४५ - हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी. २०२० - मोहित बघेल, हिंदी चित्रपट अभिनेता. प्रतिवार्षिक पालन बाह्य दुवे बीबीसी न्यूजवर मे २३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर) मे २१ - मे २२ - मे २३ - मे २४ - मे २५ - (मे महिना) Wikiwand - on Seamless Wikipedia browsing. On steroids.