फ्रान्सचा शूर योद्धा व सम्राट From Wikipedia, the free encyclopedia
नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा शूर योद्धा व सम्राट होता.
नेपोलियनचा जन्म कोर्सिका येथे झाला. जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन हा आपल्या महान कर्तृत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला. त्याने कारकिर्दीची सुरुवात फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी म्हणून केली. त्याच्या इटली, ऑस्ट्रियामधील मोहिमांमुळे तो लवकरच सैन्यात मोठा अधिकारी बनला. फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत त्याने सरसेनापतीपद हस्तगत केले. त्याने १८व्या शतकाच्या अंतामध्ये फ्रान्सवर आक्रमण करणाऱ्या अनेक आघाड्यांना परास्त केले. १८०४ मध्ये तो फ्रान्सचा सम्राट बनला. त्याने युरोपमधील बहुतेक सर्व राष्ट्रांविरुद्ध युद्धे पुकारली.
सन १८१२मध्ये त्याने रशियामध्ये केलेला हस्तक्षेप नेपोलियनला महाग पडला. रशियामध्ये नेलेल्या त्याच्या सैन्यापैकी एक चतुर्थांश सैन्यदेखील परत आले नाही. नेपोलियनचे साम्राज्य कमकुवत झालेले पाहून ६व्या ?) आघाडीने नेपोलियनच्या सैन्याचा लेप्झिग येथे पराभव केला व फ्रान्सवर आक्रमण केले. नेपोलियनला सम्राटपदावरून पायउतार व्हावे लागले, त्याला एल्बा येथे स्थानबद्ध ठेवण्यात आले. मार्च १८१५ मध्ये नेपोलियन एल्बामधून सुटून पुन्हा पॅरिसमध्ये आला व अल्पावधीतच त्याने आपले पूर्वीचे सैन्य पुन्हा एकत्र केले; पुन्हा जुन्या शत्रूंविरुद्ध आघाडी उघडली. ब्रिटन, नेदरलँडस व पर्शियानेपण प्रत्युतर म्हणून नेपोलियन विरुद्ध आघाडी उघडली. या आघाडीचे नेतृत्व नेपोलियनचा जुना शत्रु व ब्रिटनचा चाणाक्ष सेनापती वेलस्लीकडे देण्यात आले. दोन्ही फौजा वाॅटर्लू येथे भिडल्या या निर्णायक युद्धात नेपोलियनच्या सैन्याचा पूर्ण पाडाव झाला. नेपोलियनला पुन्हा अटक होऊन त्याला या वेळेस अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना या बेटावर स्थानबद्ध करण्यात आले. तेथेच त्याचा १८२१मध्ये आजारपणामुळे मृत्यू झाला. नेपोलियनच्या मृत्यूमागे अनेक रहस्ये आहेत असे समजले जाते. त्यातील एक म्हणजे त्याला अर्सेनिक हे हळूहळू परिणाम करणारे विष देण्यात आले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली व त्याचा मृत्यू झाला, असे काहींचे म्हणणे आहे. नेपोलियन नेहमी बोलत असे अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
नेपोलियनचा जन्म भूमध्य समुद्रातील कोर्सिका बेटावरील अयात्सियो येथे १५ ऑगस्ट १७६९ रोजी झाला. त्याचे नाव त्याच्या मोठ्या भावाच्या नावावरून ठेवण्यात आले. १७७० मध्ये कोर्सिका द्वीप फ्रेंचाच्या ताब्यात आले. नेपोलियनचे घराणे कुठल्याही प्रकारे लष्करी परंपरेचे नव्हते व तसेच फ्रेंचही नव्हते. बोनापार्ट घराणे हे कोर्सिकन मानले जायचे. या घराण्याची मुळे इटालियन होती. परंतु कोर्सिकामधील अन्य लोक श्रीमंत व मानाचे होते. त्याचाच फायदा नेपोलियनला फ्रान्समध्ये आल्यावर लष्करी शाळेत प्रवेश घेताना झाला.१७८४ मध्ये लष्करी शिक्षण पूर्ण झाल्यावर फ्रान्सच्या सर्वोच्च लष्करी अकादमीमध्ये त्यानेप्रवेश घेतला. नेपोलियनला गणित व भूगोलात खूप गती होती. त्याचे ऍतिहासिक लष्करी मोहिमांचेचे ज्ञान सर्वांना अचंबित करणारे होते. त्याने तोफखान्यामध्ये विषेश प्रावीण्य मिळवले.
१७८५ मध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर फ्रेंच लष्करामध्ये त्याची सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाली. सुरुवातीच्या काळात त्याची जवाबदारी लष्करी चौकीवरील अधिकारी म्हणून होती. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात नेपोलियन कोर्सिकामध्ये होता. नेपोलियनने या क्रांतीमध्ये कोर्सिकामधील जॅकोबियन गटाला साथ दिली. त्याला लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली व त्याने क्रांतीतील स्वयंसेवकांचे नेतृत्व केले. कोर्सिकामधील परिस्थिती नेपोलियनसाठि बिकट बनली व त्याला मुख्य फ्रान्समध्ये पळून यावे लागले. फ्रान्समध्ये परतल्यावर नेपोलियनचे लष्करी कारकीर्द खऱ्या अर्थाने चालू झाली. निकटवर्तीयाकडून त्याला तुलॉं येथील बंडखोरांविरुद्ध आघाडीची कामगीरी मिळाली. यातील यशामुळे नेपोलियनची ब्रिगेडियर पदावर बढती झाली. या लढाईत तो जखमीपण झाला होता. यानंतर नेपोलियनने आघाडीच्या क्रांतिकारकांबरोबर आपले हितसंबध वाढवले.
सन १७९५मध्ये नेपोलियन पॅरिसमध्ये होता जेव्हा राजेशाही समर्थक व क्रांतिकारकांमध्ये सशस्त्र उठाव झाला. राजेशाही समर्थकांना राष्ट्रीय ठराव उलथून टाकायचा होता. ह्या वेळेस नेपोलियनने बजावलेल्या कामगीरीमुळे बंडखोरांचा कणाच मोडून पडला व नेपोलियन फ्रान्समधील प्रभावशाली लष्करी अधिकारी म्हणून गणला जाऊ लागला. यानंतर नेपोलियनचे जोसेफाईनशी लग्न झाले.
इटलीतील पहिल्या मोहिमेमुळे नेपोलियनचा दरारा वाढला. या मोहिमेनंतर त्याला, त्याच्या छोट्या चणीमुळे व युद्धभूमीवरील त्याच्या शौर्यामुळे पेटिट कापोरल (छोटा कार्पोरल) असे नाव पडले खासकरून आर्कोलच्या पुलावरील लढाईत त्याने दाखवलेले शौर्याने संपूर्ण फ्रेंच सेना प्रेरित झाली. त्याने पराभवाच्या खाईतून विजयश्री अक्षरशः खेचून आणली. त्याने वाटेमध्ये लोबार्डी येथे ऑस्ट्रियन्सचा पराभव केला. व पुढे इटलीमध्ये रोम पर्यंत जाऊन धडकला. फ्रेंच राज्य कर्त्यांच्या आदेशाविरुद्ध जाऊन त्याने पोपला राज्यकारभारतून निलंबित केले. त्यानंतर १७९७ च्या सुरुवातीला ऑस्ट्रियावर हल्ला चढवला व त्यांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे इटलीच्या उत्तर भागावर पूर्णपणे फ्रेंचाचे वर्चस्व स्थापन झाले. त्यानंतर नेपोलियनने व्हेनिसवर आक्रमण करून त्यांना शरण येण्यास भाग पाडले व व्हेनिसवर हजार वर्षे चालत आलेला एकछत्री अंमल संपुष्टात आणला. १७९७ च्या अंतापर्यंत नेपोलियनने अनेक छोटे मोठे भाग फ्रेंच हद्दीत आणले. अशा प्रकारे इटलीच्या मोहिमेने नेपोलियनची युरोपवर सद्दी चालू झाली ज्याचा प्रभाव संबध युरोपवर पुढील दीड दशक राहिला.
नेपोलियनने या मोहिमेने दोन मुख्य गोष्टी साध्य केल्या त्या म्हणजे सैन्यामध्ये नेपोलियन या नावाची जादुई पकड व अनेक राज्ये काबीज केल्यामुळे फ्रेंच राज्यकारभारात वरचष्मा शाबीत झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.