From Wikipedia, the free encyclopedia
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक ही आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती असेल.[1] सदर स्पर्धा ही ३ ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती.[2] परंतु, बांगलादेशमध्ये चालू असलेल्या राजकीय अशांततेमुळे स्पर्धा आता त्याच वेळापत्रकानुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्यात आली आहे, तरीही यजमानपदाचे अधिकार बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे आहेत.[3] ऑस्ट्रेलियाचा महिला संघ हा गतविजेता आहे, त्यांनी मागील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | बांगलादेश | ||
सहभाग | १० | ||
सामने | २३ | ||
अधिकृत संकेतस्थळ |
womens | ||
दिनांक | ३ – २० ऑक्टोबर २०२४ | ||
|
आयसीसी महिला टी२० विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे आयोजित महिलांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांदरम्यान आयोजित एक व्यावसायिक आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धा आहे. आता दर दोन वर्षांनी होणारी ही स्पर्धा २००९ मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मागीलच्या स्पर्धेत १० संघ सहभागी झाले होते. गतविजेता ऑस्ट्रेलिया होता, ज्याने मागील आवृत्तीच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.
ऑगस्ट २०२४ मध्ये, आयसीसीने घोषणा केली की २०२४ महिला टी२० विश्वचषक संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला जाईल आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) अधिकृत यजमान राहील.[4]
१० पात्र संघांना प्रत्येकी ५ संघांच्या २ गटांमध्ये विभागण्यात आले; एका गटातील सर्व ५ संघ इतर सर्व संघांसोबत सामने खेळतील. प्रत्येक गटामध्ये १० सामने खेळविले जातील आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील.
२८ जुलै २०२४ रोजी, आयसीसीने घोषणा केली की ही स्पर्धा ३ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत खेळवली जाईल. ती बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती. तथापि, ऑगस्ट २०२४ रोजी आयसीसीने जाहीर केल्यानुसार, बांगलादेशच्या सध्याच्या राजकीय स्थितीमुळे कारण काही सहभागी संघांच्या देशांतर्फे लागू करण्यात आलेल्या प्रवास सल्ल्यामुळे सदर स्पर्धा आता त्याच तारखांनुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे.
१६ ऑगस्ट २०२४ रोजी, आयसीसीने जाहीर केले की सराव सामने २७ सप्टेंबर ते १ऑक्टोबर दरम्यान आयोजित केले जातील. परंतु, २६ ऑगस्ट २०२४ रोजी, सुधारित वेळापत्रकाच्या घोषणेनंतर, सराव सामने २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत खेळविले जातील.
एप्रिल २०२२ मध्ये, आयसीसीने स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेची पुष्टी केली.[1] यजमान म्हणून बांगलादेश या स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरला. पात्रता स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आयर्लंडचा पराभव करून स्कॉटलंडने प्रथमच महिला टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.[5][6] श्रीलंका दुसरा पात्र संघ ठरला. त्यांनी दुसऱ्या उपांत्य फेरीत संयुक्त अरब अमिरातीचा पराभव करून नवव्यांदा टी२० विश्वचषक गाठला.[7]एकंदरीत, २०२३ मधील दहा पैकी नऊ संघ २०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत पोहोचले, फरक इतकाच की फक्त स्कॉटलंडने आयर्लंडची जागा घेतली.[8]
पात्रता निकष | जागा | पात्र संघ |
---|---|---|
यजमान | १ | बांगलादेश |
२०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक (यजमान वगळून मागील स्पर्धेतील ६ अव्वल संघ) |
६ | ऑस्ट्रेलिया इंग्लंड भारत दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड वेस्ट इंडीज |
आयसीसी महिला आंतरराष्ट्रीय टी२० संघ क्रमवारी (२७ फेब्रुवारी २०२३ रोजी पुढील अव्वल क्रमांकाचा संघ) |
१ | पाकिस्तान |
२०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता | २ | स्कॉटलंड श्रीलंका |
एकूण | १० |
प्रत्येक संघाने स्पर्धेपूर्वी १५ खेळाडूंचा एक संघ निवडला आणि कोणत्याही जखमी खेळाडूच्या जागी नवीन नेमणूक करण्याची संघाला मुभा होती. पाकिस्तानने 25 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या संघाचे नाव जाहीर केले.[9] तर दुसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला.[10] २७ ऑगस्ट रोजी भारत आणि इंग्लंडने त्यांच्या संघांची घोषणा केली.[11][12] वेस्ट इंडीजने २९ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[13] स्कॉटलंडने २ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली.[14] त्यानंतर ३ सप्टेंबर २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या संघाची घोषणा केली.[15] न्यू झीलंडने १० सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली.[16]
जुलै २०२२ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) ने जाहीर केले की ढाका आणि सिलहट या दोन ठिकाणी विश्वचषक सामने आयोजित केले जातील.[17] जरी सिलहट हे मूळतः अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवणार होते, तरी ते यजमानपद ढाकाला मिळणार होते. नंतर, ऑगस्ट २०२४ मध्ये, आयसीसीने घोषणा केली की बांगलादेश ऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये महिला टी२० विश्वचषक खेळवला जाईल, परंतु तरीही या स्पर्धेचे आयोजन बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) करेल. हे सामने दुबई आणि शारजा येथे होणार आहेत.[18]
संयुक्त अरब अमिराती
मधील ठिकाणे | ||
---|---|---|
दुबई | शारजा | |
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम | |
प्रेक्षक क्षमता: २५,००० | प्रेक्षक क्षमता: १६,००० | |
सामने: १२ (उपांत्य आणि अंतिम सामना) | सामने: ११ (उपांत्य सामना) |
बांगलादेश
मधील मूळ ठिकाणे | ||
---|---|---|
ढाका | सिलहट | |
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | |
प्रेक्षक क्षमता: २५,४१६ | प्रेक्षक क्षमता: १८,५०० | |
सामने: १२ (उपांत्य आणि अंतिम सामना) | सामने: ११ (उपांत्य सामना) |
२४ सप्टेंबर २०२४ रोजी, आयसीसीने स्पर्धेसाठी सर्व-महिला मॅच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. दहा पंचांसोबत, जी.एस. लक्ष्मी, शांड्रे फ्रित्झ आणि मिशेल परेरा यांनाही सामनाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.[19][20]
स्पर्धेसाठी US$७,९५८,०८० ची एकूण बक्षीस रक्कम उपलब्ध होती आणि संघाच्या कामगिरीनुसार खालीलप्रमाणे रकमेची विभागणी करण्यात आली [21][22]
टप्पा | संघ | रक्कम (USD) | एकूण (USD) |
---|---|---|---|
विजेते | १ | $२,३४०,००० | $२,३४०,००० |
उपविजेते | १ | $१,१७०,००० | $१,१७०,००० |
उपांत्य सामन्यातील पराभूत संघ | २ | $६७५,००० | $१,३५०,००० |
गट फेरीतील प्रत्येक विजेता | २० | $३१,१५४ | $६२३,०८० |
५ ते ८ व्या स्थानावरील संघ | ४ | $६७,५०० | $२७०,००० |
९व्या आणि १०व्या स्थानावरील संघ | २ | $६७,५०० | $१३५,००० |
एकूण | $७,९५८,०८० |
टी२० विश्वचषकापूर्वी, सहभागी राष्ट्रे २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या दहा सराव सामन्यांमध्ये भाग घेतील. या सामन्यांना महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय दर्जा किंवा महिला टी२० दर्जा नसेल.[23]
आयसीसीने ५ मे २०२४ रोजी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.[24] स्पर्धेचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतर केल्यानंतर, २६ ऑगस्ट २०२४ रोजी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले.[25]
स्थान | संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | नि.धा. | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | ऑस्ट्रेलिया | 2 | 2 | 0 | 0 | 0 | 4 | २.५२४ | बाद फेरीसाठी पात्र |
2 | भारत | 3 | 2 | 1 | 0 | 0 | 4 | ०.५७६ | |
3 | पाकिस्तान | 2 | 1 | 1 | 0 | 0 | 2 | ०.५५५ | |
4 | न्यूझीलंड | 2 | 1 | 1 | 0 | 0 | 2 | −०.०५0 | |
5 | श्रीलंका (E) | 2 | 0 | 2 | 0 | 0 | 0 | −१.६६७ |
स्थान | संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | नि.धा. | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | वेस्ट इंडीज | 3 | 2 | 1 | 0 | 0 | 4 | १.७०८ | बाद फेरीसाठी पात्र |
2 | दक्षिण आफ्रिका | 3 | 2 | 1 | 0 | 0 | 4 | १.५२७ | |
3 | इंग्लंड | 2 | 2 | 0 | 0 | 0 | 4 | ०.६५३ | |
4 | बांगलादेश | 3 | 1 | 2 | 0 | 0 | 2 | −०.८३५ | |
5 | स्कॉटलंड (E) | 3 | 0 | 3 | 0 | 0 | 0 | −२.६७१ |
उपांत्य सामने | अंतिम सामना | |||||||
अ१ | गट अ विजेता | |||||||
ब२ | गट ब उपविजेता | |||||||
उसा१वि | उपांत्य सामना १ विजेता | |||||||
उसा२वि | उपांत्य सामना २ विजेता | |||||||
ब१ | गट ब विजेता | |||||||
अ२ | गट अ उपविजेता |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.