सॅली मार्गारेट फील्ड (६ नोव्हेंबर १९४६)[1] ही अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. पडद्यावर आणि रंगमंचावर तिच्या विस्तृत कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या, तिला तिच्या पाच दशकांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ह्या पुरस्कारांमध्ये दोन अकादमी (ऑस्कर) पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि तीन प्राइमटाइम एम्मी पुरस्कारांचा समावेश आहे, आणि एक टोनी पुरस्कार आणि दोन ब्रिटिश अकादमी (बाफ्टा) पुरस्कारांसाठी नामांकन देखील मिळाले आहे. तिला २०१४ मध्ये हॉलीवूड वॉक ऑफ फेम,[2] २०१४ मध्ये नॅशनल मेडल ऑफ आर्ट्स, २०१९ मध्ये केनेडी सेंटर ऑनर आणि २०२३ मध्ये स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड लाइफ अचिव्हमेंट अवॉर्ड[3] देण्यात आला आहे.
Sally Field (es); Sally Field (co); سیلی فیلڈ (ks); Sally Field (ms); Sally Field (en-gb); Сали Фийлд (bg); Sally Field (ro); 莎莉·菲 (zh-hk); Sally Field (mg); Sally Fieldová (sk); Саллі Філд (uk); 莎莉·菲爾德 (zh-hant); Sally Field (mul); 샐리 필드 (ko); Филд Салли (kk); Sally Field (eo); Sally Fieldová (cs); Sally Field (bs); Sally Field (an); স্যালি ফিল্ড (bn); Sally Field (fr); Sally Field (hr); सॅली फील्ड (mr); Sally Field (vi); Sallija Fīlda (lv); Sally Field (af); Сали Филд (sr); Sally Field (pt-br); 莎莉·菲尔德 (zh-sg); Sally Field (lb); Sally Field (nan); Sally Field (nb); Sally Field (ga); Σάλι Φιλντ (el); Sally Field (ilo); سالی فیڵد (ckb); Sally Field (en); سالي فيلد (ar); Sally Field (br); Sally Field (diq); Sally Field (id); 莎莉菲 (yue); Sally Field (hu); Салі Філд (be-tarask); سالی فیلد (azb); Sally Field (eu); Sally Field (da); Sally Field (bi); Салли Филд (ru); Sally Field (de-ch); Sally Field (cy); Sally Field (lmo); Салі Філд (be); Սալլի Ֆիլդ (hy); 莎莉·菲爾德 (zh); Sally Field (ku); სალი ფილდი (ka); サリー・フィールド (ja); Sally Field (ia); Sally Field (nl); سالى فيلد (arz); Sally Field (uz); סאלי פילד (he); Sally Margarita Field (la); Sally Field (qu); Sally Field (ceb); 莎莉·菲尔德 (wuu); Sally Field (fi); Sally Field (de); Sally Field (en-ca); Sally Field (ca); Sallī Fild (tg-latn); Sally Field (it); แซลลี ฟิลด์ (th); Sally Field (sv); ਸੈਲੀ ਫੀਲਡ (pa); Sally Field (et); Sally Field (pap); سالی فیلد (fa); Sally Field (sh); Sally Field (pt); Sally Field (yo); Sally Field (scn); Sali Fild (sr-el); Sally Field (vo); Sally Field (nn); Sally Field (sq); Сали Филд (sr-ec); Sally Field (sl); Sally Field (tl); Sally Field (ast); Sally Field (tr); Sally Field (war); Sally Field (pl); സാലി ഫീൽഡ് (ml); 莎莉·菲爾德 (zh-tw); سیلی فیلڈ (ur); Саллӣ Филд (tg); Sally Field (io); სალი ფილდი (xmf); Sally Field (gl); 莎莉·菲尔德 (zh-cn); 莎莉·菲尔德 (zh-hans); Sally Field (sco) actriz estadounidense (es); 美國電影女演員 (yue); amerikai színésznő, producer (hu); aktore estatubatuarra (eu); ator american (lfn); actriz d'Estaos Xuníos (ast); actriu nord-americana (ca); Aranway pukllaq (qu); cyfarwyddwr ffilm, cynhyrchydd, sgriptiwr ffilm ac actores a aned yn Pasadena yn 1946 (cy); americká herečka a režisérka (sk); aktore amerikane (sq); ամերիկացի դերասանուհի (hy); американска актриса (bg); amerikansk skuespiller (da); Amerikalı sinema oyuncusu (tr); アメリカ合衆国出身の女優、映画プロデューサー、映画監督 (ja); actriță americană (ro); American actress (en); amerikansk skådespelare (sv); US-amerikanische Schauspielerin (de); שחקנית אמריקאית (he); അമേരിക്കന് ചലചിത്ര നടന് (ml); 美國電影女演員 (zh-hant); Usana aktoro (io); 미국의 배우 (ko); yhdysvaltalainen näyttelijä (fi); американська акторка (uk); usona aktoro (eo); americká herečka a režisérka (cs); američka glumica (bs); attrice statunitense (it); মার্কিন অভিনেত্রী (bn); actrice américaine (fr); United States of America artist ŋun nyɛ paɣa (dag); амэрыканская акторка (be-tarask); އެމެރިކާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री. (mr); amerykańska aktorka (pl); pemeran perempuan asal Amerika Serikat (id); Òṣèré Ọmọ Orílẹ̀-èdè America (yo); Amerikana nga aktres (ilo); Atriz americana (pt); dramatan Lamerikänik (vo); ASV aktrise (lv); Amerikaanse aktrise (af); American actress (en-ca); American actress (en-gb); ban-aisteoir Meiriceánach (ga); صداپیشه، بازیگر، خواننده، و کارگردان آمریکایی (fa); American film an televeesion actress an director (sco); US-amerikanesch Schauspillerin an Regisseurin (lb); amerikansk skodespelar (nn); amerikansk skuespiller (nb); Amerikaans actrice (nl); ameerika näitleja (et); aktor merikano (pap); американская актриса, певица, режиссёр и продюсер (ru); خانمە ئەکتەر (ckb); actriz estadounidense (gl); ممثلة أمريكية (ar); Αμερικανίδα ηθοποιός (el); அமெரிக்க நடிகை (ta) Sally Margaret Field (es); Sally Margaret Field (hu); Sally Margaret Field (ast); Sally Margaret Field (ca); Sally Margaret Field (qu); Sally Margaret Field (de); Sally Field, 萨莉·菲尔德, 莎莉·菲 (zh); Sally Margaret Field (da); Sally Margaret Field (tr); Sally Margaret Field (ia); Field, Sally Margaret Field (sv); Sally Field (la); Саллй Фиелд (tg); Sally Margaret Field (fi); Sally Margaret Field, Sally Field (cs); Sally Margaret Field (bs); Sally Margaret Field (an); Sally Margaret Field (fr); Sally Margaret Field (et); सॅली मार्गारेट फील्ड (mr); Sally Margaret Field (scn); Sally Margaret Field (pt); Sally Margaret Field (ilo); Sally Field (sr); Sally Margaret Field (gl); Sally Margaret Field (vi); Sally Margaret Field (sco); Sally Margaret Field (id); Sally Margaret Field (nn); Sally Margaret Field (nb); Sali Fild, Sally Margaret Field (sh); Sally Margaret Field (af); Sally Margaret Field (pl); Филд, Сэлли, Сэлли Филд, Филд Салли, Филд, Салли (ru); Sally Margaret Field (ku); Sally Margaret Field (en); سالى فيلد (ar); Σάλι Μάργκαρετ Φιλντ (el); Sally Margaret Fieldová (sk)
जलद तथ्य स्थानिक भाषेतील नाव, जन्म तारीख ...
सॅली फील्ड |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
स्थानिक भाषेतील नाव | Sally Field |
---|
जन्म तारीख | नोव्हेंबर ६, इ.स. १९४६ पसादेना Sally Margaret Field |
---|
कार्य कालावधी (प्रारंभ) | |
---|
नागरिकत्व | |
---|
शिक्षण घेतलेली संस्था | - Lee Strasberg Theatre and Film Institute
- Birmingham High School
|
---|
सदस्यता | - American Academy of Arts and Sciences
|
---|
राजकीय पक्षाचा सभासद | |
---|
मातृभाषा | |
---|
वडील | |
---|
आई | |
---|
अपत्य | |
---|
पुरस्कार | - Academy Award for Best Actress (इ.स. १९८०)
- Academy Award for Best Actress (इ.स. १९८५)
- Crystal Award (इ.स. १९८६)
- Fellow of the American Academy of Arts and Sciences
- Primetime Emmy Award for Outstanding Lead Actress in a Drama Series (इ.स. २००७)
- Primetime Emmy Award for Outstanding Guest Actress in a Drama Series (इ.स. २००१)
- star on Hollywood Walk of Fame
- National Medal of Arts (इ.स. २०१४)
- Kennedy Center Honors (इ.स. २०१९)
- Hasty Pudding Woman of the Year (इ.स. १९८६)
|
---|
|
बंद करा
फील्डने दूरचित्रवाणीवर तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली ज्यात कॉमेडी मालिका गिजेट (१९६५-१९६६), द फ्लाइंग नन (१९६७-१९७०), आणि द गर्ल विथ समथिंग एक्स्ट्रा (१९७३-१९७४) मध्ये अभिनय केला.[4] तिला एनबीसी दूरचित्रवाणी चित्रपट सिबिल (१९७६) साठी मर्यादित मालिका किंवा चित्रपटातील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाला.[5] तिचे चित्रपट पदार्पण मून पायलट (१९६२) मध्ये अतिरिक्त भूमीकेत झाले होते. त्यानंतर द वे वेस्ट (१९६७), स्टे हंग्री (१९७६), स्मोकी अँड द बँडिट (१९७७), हीरोज (१९७७), द एंड (१९७८), आणि हूपर (१९७८) मध्ये तिने काम केले होते. तिने नॉर्मा रे (१९७९)[6] आणि प्लेसेस इन द हार्ट (१९८४) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे दोन अकादमी पुरस्कार जिंकले.[7] स्मोकी अँड द बँडिट २ (१९८०), अब्सेन्स ऑफ मॅलिस (१९८१), किस मी गुडबाय (१९८२), मर्फीज रोमान्स (१९८५), स्टील मॅग्नोलियास (१९८९), सोपडीश (१९९१), मिसेस डाउटफायर (१९९३) आणि फॉरेस्ट गंप (१९९४) या तिच्या उल्लेखनीय भूमिकांचा समावेश आहे.
२००० च्या दशकात, फील्ड एनबीसी वैद्यकीय नाटक ईआर मध्ये भूमिका घेऊन दूरचित्रवाणीवर परतली, ज्यासाठी तिने २००१ मध्ये ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट अतिथी अभिनेत्रीचा प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला. एबीसी नाटक मालिका ब्रदर्स अँड सिस्टर्स (२००६-२०११) मधील नोरा वॉकरच्या भूमिकेसाठी, फील्डने ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला.[8] तिने लिंकन (२०१२) मध्ये मेरी टॉड लिंकन (अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनची पत्नी) यांची भूमिका साकारली, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अकादमी पुरस्काराचे नामांकन मिळाला होते. द अमेझिंग स्पायडर-मॅन (२०१२) आणि त्याच्या २०१४ च्या पुढील भागामध्ये तिने आंट मेची भूमिका साकारली होती. तिच्या इतर भूमिकांमध्ये हेलॉ, माय नेम इज डॉरीस (२०१५) आणि ८० फॅर ब्रॅडी (२०२३), तसेच नेटफ्लिक्स मर्यादित मालिका मॅनियाक (२०१८) मधील चित्रपटांचा समावेश आहे.
एडवर्ड अल्बीच्या मूळ ब्रॉडवे प्रॉडक्शनमध्ये मर्सिडीज रुहेलची जागा घेऊन तिने व्यावसायिक रंगमंचावर द गोट ऑर हू इज सिल्व्हिया? (२००२) या नाटकातून पदार्पण केले. फिल्ड १५ वर्षांच्या अनुपस्थितीनंतर २०१७ मध्ये टेनेसी विल्यम्सच्या द ग्लास मेनेजरी या नाटकाच्या पुनरुज्जीवनासह रंगमंचावर परतली, ज्यासाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[9] २०१९ मध्ये आर्थर मिलरच्या ऑल माय सन्स या नाटकाच्या पुनरुज्जीवनातून तिने वेस्ट एंड थिएटरमध्ये पदार्पण केले.
सॅली फील्डचा जन्म कॅलिफोर्नियामधील पासाडेना येथे ६ नोव्हेंबर १९४६ रोजी अभिनेत्री मार्गारेट फील्ड आणि द्वितीय विश्वयुद्धातील सैनिक रिचर्ड ड्रायडेन फील्ड यांच्या पोटी झाला. तिचा भाऊ रिचर्ड डी. फील्ड, एक भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक व्यवसायात आहे. १९५० मध्ये तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता; आणि २१ जानेवारी १९५२ रोजी तिजुआना मेक्सिकोमध्ये, तिच्या आईने जॉक महोनी, एक अभिनेता आणि स्टंटमॅनशी लग्न केले.[10] फील्डने तिच्या २०१८ च्या "इन पिसेस" या संस्मरणात म्हणले आहे की तिच्या बालपणी महोनीने तिचे लैंगिक शोषण केले होते.[11][12] किशोरवयात, फील्डने व्हॅन नुईसमधील पोर्टोला मिडल स्कूल आणि बर्मिंगहॅम हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले, जिथे ती एक चीअरलीडर होती. तिच्या वर्गमित्रांमध्ये फायनान्सर मायकेल मिल्कन, अभिनेत्री सिंडी विल्यम्स आणि टॅलेंट एजंट मायकेल ओविट्झ यांचा समावेश होता.
फील्डने १९६८ ते १९७५ या काळात स्टीव्हन क्रेगशी लग्न केले होते. ते १९७३ मध्ये वेगळे झाले होते.[13] या जोडप्याला दोन मुलगे होते: पीटर क्रेग, जो एक कादंबरीकार आणि पटकथा लेखक आहे; आणि एली क्रेग, जो एक अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. १९७६ ते १९८० पर्यंत, फील्डचे सह-कलाकार बर्ट रेनॉल्ड्सशी संबंध होता, त्या काळात त्यांनी स्मोकी अँड द बँडिट, स्मोकी अँड द बँडिट २, द एंड आणि हूपर या चार चित्रपटांमध्ये एकत्र काम केला.[14] त्यांचे संबंध १९८० मध्ये संपले, व १९८२ मध्ये कायमचे विभक्त झाले.[15][16] फील्डने १९८४ मध्ये तिचा दुसरा पती ॲलन ग्रीझमन याच्याशी विवाह केला. एकत्रितपणे, त्यांना एक मुलगा, सॅम (जन्म १९८७) होता. फील्ड आणि ग्रीझमन यांचा १९९४ मध्ये घटस्फोट झाला.[17]
"Gidget". TV.com. CBS Interactive. August 22, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 28, 2015 रोजी पाहिले.
Richard E. Burgheim (1995). People Weekly Yearbook: The Year in Review, 1994. Time Inc. p. 77. ISBN 9781883013042.