संभाजी पार्क
From Wikipedia, the free encyclopedia
संभाजी पार्क हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील उद्यान आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात डेक्कन जिमखाना आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या मध्ये असलेल्या या उद्यानाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे. हे उद्यान जंगली महाराज रस्त्यालगत असून त्याच्या दुसऱ्या बाजूला मुठा नदी आहे.[१]
या उद्यानात मत्स्यालय, खेळातला किल्ला, कारंजे आणि मुलांना खेळण्याची साधने आहेत. या उद्यानात मोफत प्रवेश असून मत्स्यालयासाठी प्रवेशशुल्क आहे. हे उद्यान रोज खुले असते आणि मत्स्यालय बुधवार बंद तर इतर दिवशी सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ८:३० पर्यंत खुले असते.[२]
संदर्भ आणि नोंदी
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.