शम्मी
भारतीय अभिनेत्री From Wikipedia, the free encyclopedia
शम्मी (मूळ नाव:नर्गिस रबाडी) (नारगोल, २४ एप्रिल, १९३०; - मुंबई, ५ मार्च, २०१८) या भारतीय अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत काम केले आहे.

शम्मी कपूर याच्याशी गल्लत करू नका.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | शम्मी | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | एप्रिल २४, इ.स. १९२९ मुंबई Nargis Rabadi | ||
मृत्यू तारीख | मार्च ६, इ.स. २०१८ मुंबई | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
कार्य कालावधी (अंत) |
| ||
नागरिकत्व |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
|
सुरुवातीचे जीवन
शम्मी यांचे मूळ नाव नर्गिस रबाडी होते. गुजरातमधील नारगोल संजाण येथे त्यांचा जन्म पारसी कुटुंबात झाला. रबाडी या काही महिन्यांच्या असताना त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. नर्गिस या योगायोगाने तेथे आल्या.
सिनेकारकीर्द
दिग्दर्शक तारा हरीश यांनी रबाडी यांना आपले नाव बदलून शम्मी हे नवे नाव धारण करण्याचा सल्ला दिला, कारण नर्गिस नावाची एक नटी आधीच सिनेमासृष्टीत होती.
वयाच्या १८ व्या वर्षी शम्मी यांनी उस्ताद पेड्रो या चित्रपटात सहनायिकेची भूमिका केली. मल्हार या चित्रपटात त्यांना मुख्य नायिकेची भूमिका मिळाली. शम्मी यांनी नर्गिस, मधुबाला, दिलीप कुमार यांच्यासह अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले.
दूरचित्रवाणी मालिकांमधील अभिनय
शम्मी यांनी दूरचित्रवाणी मालिकांतूनही कामॆ केली. देख भाई देख ही मालिका तसेच जबान संभाल के, फिल्मी चक्की या टीव्ही शोमध्येही त्यांनी काम केले.
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.