विजय वडेट्टीवार
एक भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
विजय नामदेवराव वडेट्टीवार हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप व पुनर्वसन या विभागांचे कॅबिनेट मंत्री होते.
विजय वडेट्टीवार माजी मंत्री | |
कार्यकाळ ३० सप्टेंबर २०२३ – डिसेंबर २०२४ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
मतदारसंघ | चिमूर विधानसभा मतदारसंघ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
मागील इतर राजकीय पक्ष | शिवसेना |
वडील | नामदेवराव |
अपत्ये | शिवानी व ईतर ३ |
व्यवसाय | राजकारण |
वडेट्टीवार हे माजी आमदार असून चिमूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेत झाली असून, नंतर त्यांनी नारायण राणे यांचेसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसच्या पक्षातर्फे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.[१][२][३] चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी उत्पादनशुल्क मंत्री यांना २७ ऑगस्ट २०२० रोजी, सर्वप्रथम पत्र लिहून दारुबंदी उठवण्याची मागणी केली होती.[४]
२०२४ विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना काँग्रेस च्या विधीमंडळ पक्षनेते (CLP-leader) पदी निवड करण्यात आली.
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.