लोणार तालुका
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
लोणार (बुलढाणा) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
लोणार पासून जवळ असणारी पर्यटन व धार्मिक स्थळे
लोणार
सिंदखेड राजा
सोनाटी
औंढा नागनाथ
लोणी सखाराम महाराज
मेहकर
नर्सी
येलदरी
माहूर
शेगाव
LONAR लोणार विषयी थोडे
रिसोड पासून साधारणपणे ३५ मैलावर मेहकर तालुक्यातील लोणार हे प्रसिद्ध गाव आहे. तहसील व मुख्यालयाचा बेरार प्रांतातील सर्वात जुन्या वसाहतींमध्ये समावेश होतो. ह्या भागातील परंपरेचा संबंध हिंदूंच्या त्रेता युगाशी जोडला जातो. स्कंध पुराणातील लवणासुराची गोष्ट असे सुचविते की तो राक्षस याच परिसरात राहून आजूबाजूच्या परिसरावर राज्य करीत असे. प्रत्यक्ष देवांशी सुद्धा दोन हात करण्याची त्याची तयारी होती. त्याचे मनसुबे लक्षात घेऊन देवांनी त्याचा नायनाट करण्याची विष्णूस विनवणी केली. विष्णूने दैत्यसुदनेचे रूप धारण कले व त्याच्या दोन बहिणींच्या आपल्या सौंदर्याने वश करून त्यांचेच साहाय्याने त्याचे स्थान शोधून काढले. अंगठ्याच्या स्पर्शाने विष्णूने त्या राक्षसाला जमिनीतून शोधून काढले. नंतर झालेल्या संघर्षातच त्याच्या राहत्या जागेतच विष्णूने त्याला त्याचे घर असलेल्या खड्ड्यातच पुरून टाकले. गावातील सरोवराच त्या राक्षसाची गुहा होती आणि दातेफळ या आग्नेयेकडे साधारणपणे ३६ मैलावर असणाऱ्या खेड्यापाशी असणारी शंकूसारखी टेकडी म्हणजे त्या गुहेचे टोक. हे टोक विष्णूने आपल्या पायाच्या अंगठ्याने उध्वस्त केले अशी मान्यता आहे. तीनही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेल्या त्या सरोवरात आजूबाजूच्या परिसराचे अप्रतिम प्रतिबिंब दिसत असते. पाणी म्हणजे त्या राक्षसाचे रक्त व त्यातील मीठ (पाणी खारे आहे) म्हणजे त्याचे सडलेले मांस अशी मान्यता आहे. मात्र "लोणार महात्म" काही वेगळेच सांगते. ज्या सात ऋषींनी अठरा स्त्रियांशी विवाह करून देव व दैत्यांना जन्म दिला त्याचेपैकी एक असणाऱ्या काश्यप ऋषीच्या पत्नींपैकी एका पत्नीने जन्म दिलेला पाहिला राक्षस पुत्र म्हणजे लवणासुरा होय. तो पाहिला दैत्य होता. सध्याच्या लोणारच्या जागी असण्याऱ्या एका पर्वतावर लवणासुराने तप करून महादेवाला प्रसन्न केले. तपस्येने प्रसन्न झालेल्या महादेवाने लवणासुरा समोर प्रगट होऊन त्याचा इच्छीत वर मागण्यास सांगितले. जेव्हा लवणासुराने अमरत्वाचा वर शंकराकडे मागितला त्यावेळी तेहतीस कोटी देवांनी एका सुरात अशी वाणी केली की पाच वर्षाच्या एका बालकाकडून लवणासुराचा वध होईल. यानंतर शंकराने हिमालयात प्रस्थान केले व लवणासुराने तीनही लोक जिंकून घेऊन स्वतः इंद्राच्या सिंहासनावरून राज्य करू लागला. सरोवराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच एक मोठा बारमाही झरा (किंवा धार)आहे. एका आख्यायिकेनुसार एका ऋषीने बनारसला गंगते एक काडी सोडून लोणारकडे प्रस्थान केले व वेळेत पोहचून लोणारच्या धारेतून ती काडी बाहेर पाडताना दाखवले. ही धार चहू बाजूने वेगवेगळ्या हेमाडपंथी देवळांनी वेढलेली असून. झऱ्याचे पाणी एका गोमुखातून त्याखाली असणाऱ्या एका कुंडात पडते. त्या कुंडात स्नान करण्यासाठी अनेक लोक येत असतात. सरोवरा भोवती अनेक देवळे आहेत व त्यातील बहुतेक अत्यंत पडक्या अवस्थेत आहेत.धारेच्या पूर्वेकडे मंदिराच्या समूहात एक नरसिंहाचे मंदिर आहे. या हेमाडपंथी मंदिराच्या भिंती व दारांवर मनुष्यांच्या व हत्तींच्या प्रतिमा कोरल्या आहेत. नरसिंहाचे मदिरा शेजारीच गणेशाचे सुद्धा एक मंदिर आहे. तेथे रेणुका मातेचे सुद्धा एक मंदिर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads