रामचंद्र नारायण दांडेकर
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
रामचंद्र नारायण दांडेकर (मार्च १७, १९०९ - डिसेंबर ११, २००१) हे भारतीय भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रामचंद्र नारायण दांडेकर |
---|
दांडेकरांनी संस्कृत (१९३१) व अर्वाचीन भारतीय संस्कृती (१९३३) या विषयांमध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन केली होती.
काही वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालय अध्यापन केल्यानंतर ते जर्मनीतल्या हिडेलबर्ग विद्यापीठात संशोधन करण्यासाठी १९३६ साली रवाना झाले.
तेथे त्यांनी सादर केलेल्या प्रबंधास (Der Vedische Mensch) १९३८ साली पीएच.डी. साठी मान्यता मिळाली.
भारतात परतल्यानंतर त्यांनी []फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयांत]] अध्यापक (१९३९-१९५०), पुणे विद्यापीठाच्या संस्कृत व प्राकृत भाषा विभाग प्रमुख (१९५० - १९५८), कला विभागाचे प्रमुख (१९५९ - १९६५) व संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे संचालक (१९६४ - १९७४) म्हणून काम पाहिले.
१९३४ पासून पुढील ५५ वर्षे भांडारकर प्राच्य विद्या मंदिराचे मानद सचिव तसेच १९९४ ते २००१ पर्यंत ते त्या संस्थेचे उपाध्यक्ष होते. उपखंडातील भाषांसंदर्भात संशोधन व इतर कार्य करणाऱ्या अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी (उदा. ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स, इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएंटलिस्ट्स, दी वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स, दी संस्कृत कमिशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया,युनेस्कोचे सल्लागार, वगैरे) ते संलग्न होते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.