भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग From Wikipedia, the free encyclopedia
राग यमन हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
अधिक माहिती यमन ...
यमन
थाट
कल्याण
प्रकार
हिंदुस्तानी
जाती
संपूर्ण
स्वर
सा रे ग म प ध नि
आरोह
नि रे ग म ध नि सां
अवरोह
सां नि ध प म ग रे सा
वादी स्वर
गंधार
संवादी स्वर
निषाद
पकड
गायन समय
रात्रीचा पहिला प्रहर, (संध्याकाळ)
गायन ऋतू
समप्रकृतिक राग
जैमिनी कल्याण, यमन कल्याण, यमनी बिलावल
उदाहरण
कठिण कठिण कठिण किती, पुरुष हृदय बाई - (नाटक-पुण्यप्रभाव) तीव्र मध्यम (कोमल स्वर लागत नाही)
इतर वैशिष्ट्ये
श्रृंगार रस
बंद करा
या रागाला कल्याण असेही संबोधले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम समयी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो. शांत आणि भक्तिपूर्ण अशा सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे प्रतिनिधित्व करणारा राग मानला जातो. कल्याण रागांची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात.
स्वर - सा रे ग म प ध नि
आरोह -नी रे ग म धनी सां
अवरोह - सांनी ध प म ग रे सा
म - तीव्र मध्यम.
ह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. आरोहामध्ये षड्ज आणि पंचम हे स्वर शक्यतो लावत नाहीत (लांघन अल्पत्व). या रागाचा वादी स्वर गंधार असून संवादी निषाद मानल जातो. रागामध्ये ऋषभ, गंधार, पंचम आणि निषाद ही प्रमुख न्यास स्थाने (विश्रांती स्थाने) मानली जातात. अनेक कलाकारांच्या गायनामध्ये तीव्र मध्यमाला सुद्धा सौंदर्यपूर्ण महत्त्व दिलेले आढळते.
रागात नेहमी ऐकू येणाऱ्या स्वरावली खालीलप्रमाणे.
नि रे ग,नी रे ग म प ->(मग) रे, ग रे सा, ग मे ध नि, ग मे धनी ध प, प म (ग)रे ग रे सा इत्यादी. प -> रे ही संगती रागांग कल्याणचे एक वैशिष्ट्य आहे.
यमन हा अतिशय लोकप्रिय राग असून मैफिलींमध्ये पुष्कळ वेळा गायला/वाजवला जातो. या रागावर आधारित असंख्य चित्रपटगीते तसेच भावगीते आहेत.
जैमिनी कल्याण
यमन कल्याण
यमनी बिलावल
यमुना कल्याणी (कर्नाटकी संगीतातला राग)
(गीताचे शब्द, चित्रपटाचे नाव, संगीत दिग्दर्शक आणि गायक/गायिका या क्रमाने).
अभीना जाओ छोडकर (हम दोनों) जयदेव (आशा-रफ़ी)
आज जानेकी ज़िदना करो (गझल) फरीदा खानम (फरीदा खानम)
आप के अनुरोध में (अनुरोध)? (मुकेश)
आसूं भरी ये जीवन की राहें (परवरिश) दत्ताराम (मुकेश)
कशि केलिस माझी दैना - स्वरसम्राज्ञी नाटकातले गीत (संगीतकार?, कीर्ती शिलेदार)
का रे दुरावा - ’मुंबईच्या जावई’मधले गीत (सुधीर फडके, गायिका?)
चंद्र दोन उगवले, जादू काय ही तरी? एक चंद्र अंबरी एक मंचकावरी (चित्रपटगीत; चित्रपट: भाग्यलक्ष्मी, गायक: सुधीर फडके; संगीत: राम कदम; कवयित्री शांता शेळके)
चांदकिरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा, फुले प्रकाशाची माझ्या दारी अंथरा (चित्रपटगीत; चित्रपट: वैभव; गायिका: आशा भोसले, संगीत: राम कदम, कवी: ग.दि. माडगूळकर)