Remove ads
मराठी अभिनेते From Wikipedia, the free encyclopedia
रमेश भाटकर (जन्म : ३ ऑगस्ट १९४९; - ४ फेब्रुवारी २०१९) हे एक नावाजलेले मराठी अभिनेते होते. गायक - संगीतकार स्नेहल भाटकर यांचे ते सुपुत्र होते. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी दूरदर्शन मालिका, रंगभूमी, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत विविधांगी अभिनय केला होता.
रमेश भाटकर | |
---|---|
जन्म |
३ ऑगस्ट १९४९ कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
४ फेब्रुवारी २०१९ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | अश्रूंची झाली फुले |
प्रमुख चित्रपट | माहेरची साडी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | माझे पती सौभाग्यवती |
पुरस्कार | जीवनगौरव पुरस्कार |
वडील | वासुदेव भाटकर |
पत्नी | मृदुला भाटकर |
अतिशय उमद्या आणि खेळकर व्यक्तिमत्त्वाच्या [1] रमेश भाटकर ह्यांनी अभिनयासोबत जलतरणातही विशेष प्रावीण्य कमावले होते. तसेच ते उत्कृष्ट खो-खो पटू होते. [2] आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास तीसहून अधिक मालिकांमध्ये आणि ५०हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला.
९८व्या मराठी नाट्यसंमेलनामध्ये त्यांचा 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. [3]
रमेश भाटकर ह्यांच्या गाजलेल्या कलाकृती पुढीलप्रमाणे [4]
ते कर्करोगाचे रुग्ण होते. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथे एलिझाबेथ रुग्णालयात त्यांची जीवनज्योत मालवली. त्यावेळी ते ७० वर्षांचे होते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.