मुठा नदी
पुणे जिल्ह्यातील एक नदी From Wikipedia, the free encyclopedia
मुठा नदी पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे.[१] ह्या नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत होतो.[२] ती पूर्व दिशेला वाहते. पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम मुळा नदीशी होतो. ही मुळा-मुठा नदी पुढे जाऊन अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे भीमा नदीस मिळते.[ संदर्भ हवा ]
मुठा | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | भीमा नदी |
धरणे | पानशेत धरण, खडकवासला धरण |

भौगोलिक रचना
उगम
लवासा या गिरिस्थानाकडे जाताना टेमघर धरण लागते. हे मुठेवरचे पहिले धरण आहे. येथून लवासाला जाण्यासाठी डावीकडे वळले की उजवीकडचा दुर्गम कच्चा रस्ता जांभळी गावापासून पुढे निरगुडवाडीला जातो. त्यापुढचा रस्ता मात्र पायी ट्रेकिंग करत जावे असा आहे. साधारण दहा किमी अंतरावर मांडवखडक वस्तीजवळ मुठा नदी सुरू होते. या उगमावरती एक गोमुख बसविलेले आहे.[ संदर्भ हवा ] उगमानंतर काही अंतरावर मुठेचे लहान मुलाप्रमाणे अवखळपणे दुडदुडणारे रुपडे दिसते. नंतर सांगरुणला आंबी नदी मुठेला येऊन मिळते. या जोडनदीला थोड्याच अंतरावर मोसे नदीसुद्धा येऊन मिळते. हा त्रिवेणी संगम आहे. मुठा नदी ही प्राचीन नदी आहे.
प्रवाह
संगम
नदी काठची गावे
भूशास्त्रीय रचना
उगम ते संगम प्रवास
मुठा नदी पश्चिम घाटातील वेगरे या गावी उगम पावते. वेगरे पुण्यापासून पश्चिमेला सुमारे ३५ कि.मी. आहे. तेथून लवार्डे, माळे, मुठे, सांगरुण, खडकवासला असा प्रवास करत ती पुणे शहरात येते. खडकवासला धरणाच्या अलीकडे आंबी व मोशी ह्या मुठेच्या उपनद्यांचा संगम होतो व तो एकत्रित प्रवाह मुठेला मिळतो.
पुणे शहरात मुठा ही मुळा नदीला मिळते, ह्या जागेला मुळा-मुठा संगम म्हणतात. तेथे संगमेश्वराचे मंदिर आहे. तेथील घाट अहिल्यादेवी होळकर ह्यानी बांधला आहे, असे म्हणतात. मुळा-मुठा नदी म्हणून ही पुढे जाते, पुणे जिल्ह्यातील रांजणगांव सांडस येथे भीमा नदीला मिळते. हा मुळा आणि मुठा ह्या नद्यांचा शेवट आहे कारण इथून पुढे त्या भीमेचा भाग म्हणून वाहतात. भीमा नदी पुढे कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते. कृष्णा नदी आंध्रप्रदेशात विजयवाडा येथे बंगालच्या उपसागराला मिळते. दख्खनच्या पठाराला पूर्वेकडे उतार असल्याने ह्या भागातील बहुतेक नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात.[ संदर्भ हवा ]
उपनद्या
मुठा नदीच्या आंबी व मोशी (किंवा मोसे) ह्या दोन उपनद्या आहेत.
ओढे
किरकिटवाडी ओढा, कोंढवे-धावडे येथील कुंजाईचा ओढा, आंबील ओढा, नांदोशी, शिवणे, वारजे, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील ओढे व नागझरी हे मुठेला मिळणारे काही ओढे आहेत. पूर्वेला नागझरी, पश्चिमेला आंबील ओढा व उत्तरेला मुठा अशा ठिकाणी पुणे शहर वसले. दोन नद्यांचा संगम आपल्या संस्कृतीत पवित्र मानला जातो. मुळा-मुठा नदीच्या संगमाजवळची वस्ती, म्हणून तिचे नाव पुण्यविषय पडले. पुण्यविषय, पुण्यकविषय, पुणेवाडी म्हणून ओळखले जाणारे हे गाव पुढे पुणे म्हणून प्रसिद्ध लागले.
आंबील ओढ्यावरच नानासाहेब पेशव्यांनी बांधून अंमलात आणलेली प्रसिद्ध “कात्रज नळ योजना” होती. या योजनेचे पाणी नाना फडणविसांच्या वाड्यासमोरच्या नाना हौदात येत असे.
नागझरी ही एकेकाळी नदी होती. हिच्या काठावर काही प्रेक्षणीय मंदिरे आहेत.
इतिहास
पुरातत्त्वीय
ऐतिहासिक घटना
१२ जुलै १९६१ साली पानशेत धरण फुटून पुण्यात महाप्रचंड पूर आला आणि पुणे शहराला जी धरणे पुढे वर्षभर पाणी-पुरवठा करणार, ती त्या दिवशी केवळ काही तासांत पूर्ण रिकामी झाली. पानशेत धरण परत बांधावे लागले. हे काम १९७५ मध्ये पूर्ण झाले तर खडकवासला धरणाची दुरुस्ती होऊन १९६५ सालपासून त्यात पाणी साठविणे शक्य झाले. तोपर्यंत पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यात ह्या ओढ्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.[ संदर्भ हवा ]
धार्मिक वैशिष्ट्ये
सांस्कृतिक वैशिष्ट्ये
जल व्यवस्थापन
धरणे
बंधारे
कालवे
मुठा व तिच्या उपनद्यांवरील धरणे
- खडकवासला येथे मुठा नदीवरचे मोठे धरण आहे. पुणे शहराला पाण्याचा मुख्य पुरवठा येथून होतो.
- टेमघर धरण : मुठा नदीवरील हे मध्यम आकाराचे धरण पुणे-लवासा रस्त्यावर आहे.
- पानशेत धरण : हे आंबी नदीवर आहे.
- वरसगाव धरण : हे मोसी नदीवर आहे.
अर्थशास्त्रीय वैशिठ्ये
उपजीविका
शेती
मासेमारी
उद्योग
पर्यटन
मुठा नदीकाठची गावे
पायाभूत सुविधा
पूल
दळणवळण
सांडपाणी व्यवस्थापन
जल वाहिन्या
व्यावसायिक वापर
तीर्थक्षेत्र (घाट, इ.)
पूल
- एस.एम.जोशी पूल
- ओंकारेश्वर पूल (विठ्ठल रामजी शिंदे पूल)
- जयंतराव टिळक पूल
- झेड पूल (Z-Bridge)
- दगडीपूल (डेंगळे पूल)
- नवा पूल (शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
- भिडे पूल
- म्हात्रे पूल
- यशवंतराव चव्हाण पूल
- राजाराम पूल
- लकडीपूल (संभाजी पूल)
- वारजे पूल( देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
- संगम पूल (रेल्वेचा आणि वाहनांचा). हा मुठेवरचा शेवटचा पूल.
- आणि शिवाय दुचाकीसाठीचे दोन पूल आणि काही कॉज वे
पर्यावरण
परिसंस्था
जैव विविधता
वनस्पती
प्राणी
बाहेरचे / आक्रमक वनस्पती व प्राणी
पाण्याची गुणवत्ता
प्रदूषण
मुठा नदी शिवणे येथे कुंठित झाली आहे. आसपासच्या गावांचा कचरा आणि सांडपाणी त्यात मिसळते. येथून पुढे मुठा नदी पुणे शहरात प्रवेश करते. या नदीत झालेल्या प्रचंड प्रदूषणामुळे यातील माशांच्या १२० प्रजातींपैकी फक्त १६ प्रजाती आता शिल्लक आहेत. पुणे शहरात आल्यानंतर या नदीमध्ये केवळ दोन जातीचे मासे आढळतात. [३]
मैलापाणी वहन
सांडपाणी
घन कचरा
राडारोडा
उद्योगांद्वारे सोडलेले उत्सर्जन
शेतीद्वारे होणारे उत्सर्जन
उघड्यावर शौच
सण, उत्सव, धार्मिक विधी मुळे होणारे प्रदूषण
समाजावर होणारे परिणाम
अतिक्रमणे
घातक उद्योग
नैसर्गिक आपत्ती
कार्यरत लोक चळवळी, संस्था, इ.
शासकीय परिपत्रके, अहवाल, न्यायालयीन आदेश, इ.
साहित्य
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.