महेश मांजरेकर

From Wikipedia, the free encyclopedia

महेश मांजरेकर

महेश मांजरेकर (ऑगस्ट १६, इ.स. १९५८ - ) हे एक आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते आहेत. प्रामुख्याने हिंदीमराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेले वास्तवअस्तित्त्व हे हिंदी चित्रपट लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या अभिनय जीवनाची सुरुवात १९८४ साली अफलातून ह्या मराठी नाटकामधून केली. त्यांना आजवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व दोन स्क्रीन पुरस्कार मिळाले आहेत. दिग्दर्शनाशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनयही केला आहे त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांचाही समावेश आहे. 'कांटे'या चित्रपटामुळे त्यांना अभिनयात यश मिळण्यास सुरुवात झाली. तेलुगू चित्रपट ओक्काडुन्नडु (२००७)आणि स्लमडॉग मिलिनिअर (२००८) या चित्रपटात जावेद असे नकारात्मक भुमिकाही त्यांनी केल्या. त्यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ह्या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली.त्यांची सचिन खेडेकर,आणि विद्याधर उर्फ बाप्पा जोशींबरोबर जोडी प्रसिद्ध आहे.

जलद तथ्य महेश मांजरेकर, जन्म ...
महेश मांजरेकर
Thumb
जन्म १६ ऑगस्ट, १९५८ (1958-08-16) (वय: ६६)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८४ - चालू
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम बिग बॉस मराठी
पत्नी मेधा मांजरेकर
अपत्ये सई मांजरेकर
बंद करा

कारकीर्द

अभिनय

अधिक माहिती वर्ष, चित्रपट ...
वर्षचित्रपटभाषा
1999वास्तवहिंदी
2001एहसासहिंदी
2003कांटेहिंदी
2003प्राण जाये पर शानना जायेहिंदी
2004प्लॅनहिंदी
2004रनहिंदी
2004मुसाफिरहिंदी
2005इट वॉज रेनिंग दॅट नाईटइंग्लिश/बंगाली
2006जिंदाहिंदी
2006जवानी दिवानीहिंदी
2007दस कहानियांहिंदी
2007ओक्काडुन्नाडूतेलुगू
2007पद्मश्री लालू प्रसाद यादवहिंदी
2008मीराबाई नॉट आऊटहिंदी
2008स्लमडॉग मिलियोनेरहिंदी/इंग्लिश
2008होममतेलुगू
2009मी शिवाजीराजे भोसले बोलतोयमराठी
2009वॉन्टेडहिंदी
2009९९हिंदी
2009फ्रुट अँड नटहिंदी
2009तीन पत्तीहिंदी
2010अधुर्सतेलुगू
2010दबंगहिंदी
2010डॉन सीनूतेलुगू
2011रेडीहिंदी
2011फक्त लढ म्हणामराठी
2011बॉडीगार्डहिंदी
2012तुक्का फिटहिंदी
2012ओ.एम.जी. – ओ माय गॉड!हिंदी
2012जय जय महाराष्ट्र माझामराठी
2013हिम्मतवालाहिंदी
2013शूटआऊट ॲट वडाळाहिंदी
2013आरंबमतमिळ
2013रज्जोहिंदी
2013आजचा दिवस माझामराठी
2014जय होहिंदी
2014रेगेमराठी
2014सिंघम रिटर्न्सहिंदी
2014अर्धांगिनीबंगाली
बंद करा

दिग्दर्शक

निर्माता

  • प्राण जाये पर शानना जाये (2003)
  • इट वॉज रेनिंग दॅट नाईट (2005)

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.