From Wikipedia, the free encyclopedia
"महेश एलकुंचवार यांची नाट्यसृष्टी भारतीय रंगभूमीवरील महान दस्तऐवज":
भारतीय रंगभूमीवरील महान नाटककार महेश एलकुंचवार यांनी नाट्यमय अभिव्यक्तीचे अनेक प्रकार आपल्या नाटय लेखनात केलेले आहेत. ज्यात वास्तववादी , प्रतीकात्मक, अभिव्यक्तीवादी शैलीत त्यांनी रचना केलेल्या आहेत. सर्जनशीलता ही त्यांच्याकडे उपजत आहे.जीवनवादी नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जन्म ते मृत्यू यासारख्या विविध थीम त्यांनी मांडल्या आहेत. तीन ते चार दशकांहून अधिक काळ आधुनिक भारतीय रंगमंचावर त्यांचा प्रभाव आहे. 1967 मध्ये सत्यकथा या प्रख्यात साहित्यिक मासिकात "सुलतान" या त्यांच्या एकांकिकेच्या प्रकाशनानंतर महेश एलकुंचवार नाट्यसृष्टीत प्रकाशझोतात आले . प्रसिद्ध दिग्दर्शक विजया मेहता यांनी एलकुंचवार यांची नाट्यकृती रंगमंचावर आणली.1969 आणि 1970 मध्ये होळी आणि सुलतान यांच्यासह रंगायनसाठी त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले.महेश एलकुंचवार यांच्या नाटकांवर आधारित होली ,रक्तपुष्प, पार्टी , विरासत अशा अनेक व्यावसायिक चित्रपटांनंतर यश मिळाले.
महेश एलकुंचवार यांच्या नाटकांचे अनेक भारतीय आणि पाश्चात्य भाषांमध्ये भाषांतर केले गेले. (इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन इत्यादी)
1984 मध्ये त्यांच्या होळी या नाटकावर केतन मेहता यांनी होली या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यासाठी महेश एलकुंचवार यांनी पटकथा लिहिली होती. त्याच वर्षी गोविंद निहलानी यांनी महेश एलकुंचवार यांच्या पार्टी नावाच्या नाटकावर आधारित ‘पार्टी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सोनाटा या एलकुंचवार यांच्या अभिजात नाटकावर आधारित
चित्रपटात अपर्णा सेन, शबाना आझमी आणि ललित दुबे यांनी भूमिका साकारल्या आहेत.महेश एलकुंचवार यांची नाट्यसृष्टी भारतीय रंगभूमीवरील महान दस्तऐवज आहे.
संदर्भ:
1. महेश एलकुंचवार; शांता गोखले आणि मंजुळा पद्मनाभन (अनुवाद) (2004). सिटी प्ले (प्लेस्क्रिप्ट). सीगल बुक्स. आयएसबीएन 8170462304. २. महेश एलकुंचवार खंड १( संग्रहित नाटकः ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस) २००८.
3. महेश एलकुंचवार खंड २ ( संग्रहित नाटकः ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस) २०११.
महेश एलकुंचवार | |
---|---|
जन्म | ९ ऑक्टोबर १९३९ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
महेश एलकुंचवार (जन्म : ९ ऑक्टोबर १९३९)
महेश एलकुंचवारांचा जन्म विदर्भातील परवा गावात स्थलांतरीत तेलगू ब्राह्मण कुटुंबात झाला . वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी आपले आईवडील आणि जन्मगाव सोडून दिले . त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मॉरिस महाविद्यालयात आणि पदवीत्तर शिक्षण इंग्रजी साहित्यात नागपूर विद्यापीठातुन झाले . हे मराठीतील साठोत्तर कालखंडातील एक महत्त्वाचे नाटककार आहेत. त्यांच्या वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त या तीन नाटकांचा मिळून मराठी रंगभूमीवर झालेला सलग दीर्घ रंगमंचीय प्रयोग वैशिष्ट्यपूर्ण ठरला असून तो त्रिनाट्यधारा' म्हणून ओळखला जातो. महेश एलकुंचवारांनी धर्मपीठ आर्टस् आणि कॉमर्स महाविद्यालय , नागपूर आणि एम.पी. देव मेमोरियल सायन्स महाविद्यालय नागपूर या ठिकाणी इंग्रजी साहित्याचे अध्यापन केले . ते १९९० साली विभागप्रमुख या पदावरून निवृत्त झाले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा , दिल्ली या ठिकाणी त्यांनी विझिटिंग प्राध्यापक म्हणूनही कित्येक वर्ष काम केले . महेश एलकुंचवारांचे वाडा चिरेबंदी या नाटकाचा इंग्रजी भाषे मध्ये " द ओल्ड स्टोन मॅन्शन " नावाने अनुवाद करण्यात आला आहे . मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ ही नाट्यकृती प्रसिद्ध आहे. ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचे आतापर्यंत व्यावसायिक रंगभूमीवर १४० प्रयोग झाले असून ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाचे सात प्रयोग झाले आहेत. निवेदिता जोशी-सराफ, प्रसाद ओक, वैभव मांगले, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर असे तगडे कलाकार या नाटकामध्ये काम करत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन प्रतिथयश रंगकर्मीं चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे.‘वाडा चिरेबंदी’तील व्यक्तिरेखांचे दहा वर्षांनंतर नेमके काय होते असा विचार एलकुंचवार यांच्या मनात आला. समाज बदलतो तशी मूल्यं बदलतात. पिढी बदलते तसे नातेसंबंधही बदलतात. हे ध्यानात घेऊन प्रकाश टाकण्याच्या उद्देशातून ‘वाडा’चा दुसरा भाग म्हणून एलकुंचवारांनी ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाचे लेखन केले. रुद्रवर्षा, वासनाकांड, पार्टी, वाडा चिरेबंदी, आत्मकथा, प्रतिबिंब, मग्न तळ्याकाठी,युगान्त, गार्बो, सोनाटा, एका नटाचा मृत्यू ही एलकुंचवारांची नाटके आहेत. आत्मकथा, पार्टी, प्रतिबिंब, रक्तपुष्प, वाडा चिरेबंदी या नाटकांचे हिंदी भाषेत, तर यांतील काही नाटकांचे बंगाली व इंग्लिश भाषेतही अनुवाद झाले आहेत.[ संदर्भ हवा ]
‘मौनराग’ आणि 'त्रिबंध' हे त्यांचे दोन ललितनिबंध संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या ललित लेखसंग्रहांनी मराठी ललितलेखनाच्या परंपरेतही त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. [1]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.