From Wikipedia, the free encyclopedia
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २००८ सालापासून महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी या गावी राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. त्याचे संयोजन साहित्य परिषदेची पुरंदर तालुका शाखा करते. संमेलनाची संकल्पना पत्रकार कवी दशरथ यादव यांची असून, या संमेलनाच्या कामात शरद गोरे, दशरथ यादव, राजकुमार काळभोर, प्रा,केशव काकडे, नंदकुमार दिवसे, दत्ता भोंगळे, सुनील धिवार, रविंद्र फुले यांचा सक्रिय सहभाग असतो. संमेलनाच्या निमित्ताने उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
विदर्भामध्ये महात्मा फुले साहित्य संमेलन या नावाने एक संमेलन भरते. ते संमेलन, या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाहून वेगळे आहे.
पहा : मराठी साहित्य संमेलने ; दलित साहित्य संमेलन; महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन
Seamless Wikipedia browsing. On steroids.