From Wikipedia, the free encyclopedia
दलित संमेलने ही विविध नावांनी भरतात, त्यांतली काही नावे खाली दिली आहेत. परंतु 1961 पासून 'दलित साहित्य' संकल्पनेला विरोध करीत भाऊसाहेब अडसूळ, आप्पासाहेब रणपिसे व विजय सोनवणे यानी बौद्ध साहित्य संमेलने भरवली ती परंपरा आजही सुरू आहे. म्हणुन बौद्ध साहित्य संमेलने ही दलित साहित्य संमेलनात मोडली जात नाहीत.
दलित साहित्य संमेलने:
असे असले तरी दलित साहित्य संमेलन या मूळ नावाने भरलेली काही संमेलने अशी :
१) गोवंश हत्याबंदी कायदा व समर्थन यांना प्रतिबंध करावा. २) स्वतंत्र आंबेडकरवादी साहित्य कला अकादमी (शासनाने) स्थापन करावी. ३) भारतीय राज्यघटना राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करावा. ४) सर्व विद्यापीठांत ‘दलित’ऐवजी ‘आंबेडकरवादी साहित्य’ असे नामांतर करावे. ५) देशातील दहशतवाद अन् जातीय अन्याय अत्याचार रोखणारे धोरण व प्रबोधन अभियान सुरू करावे. ६) सध्याचे आरक्षण धोरण न बदलता राबवावे. ७)कुटुंब नियोजनाचे धोरण-कायदा सक्त करावा. ८) आंबेडकरवादी कलावंतांचा कोश शासनाने निर्माण करावा.९) विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या खूनसत्राबाबत शासनाने ठाम भूमिका घेऊन प्रतिकाराचे धोरण ठरवावे. १०) शासनाने जातीअंताचे धोरण व कार्यक्रम ठरवावा. ११) अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवून विचारांच्या आधारावर नागरिकांना देशद्रोही ठरवू नये.
या ठरावांची प्रत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सरकारी प्रतिनिधी म्हणून देण्यात आली.
Seamless Wikipedia browsing. On steroids.