भारतातील कार्यकारी अधिकार From Wikipedia, the free encyclopedia
भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांचा समावेश होतो. या केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान करतात.[१]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उपवर्ग | केंद्रीय मंत्रिमंडळ | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | भारत सरकार (executive branch) | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | भारत | ||
भाग | |||
|
केंद्रीय मंत्रिमंडळ नावाची कार्यकारी संस्था ही भारतातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे.[२] कलम ७५ नुसार केवळ पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री दर्जाचे मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.
कलम ७५(3)च्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ हे भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहास (लोकसभा) उत्तरदायी आहे. जेव्हा लोकसभेत मंत्र्याने मांडलेले एखादे विधेयक मंजूर होत नाही, त्यास तेव्हा संपूर्ण मंत्रीपरिषद जबाबदार असते. लोकसभेचा विश्वास गमावल्यानंतर मंत्रिमंडळ नवीन सरकारच्या स्थापनेसाठी राजीनामा देते.
कलम ७८(c) नुसार मंत्रिपरिषदेचा विचार न करता एखादा मंत्री कोणताही निर्णय घेऊ शकतो.
सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्यांनी कलम ३५२ नुसार आणीबाणीच्या घोषणेचा प्रस्ताव राष्ट्रपतींना लेखी सादर करावा लागतो.
भारतीय संविधानाच्या मते, मंत्रीमंडळात लोकसभा सदस्यांच्या एकूण संख्येच्या १५% पेक्षा अधिक मंत्री संख्या नसावी. मंत्री हे संसदेच्या एका सभागृहाचे सदस्य असले पाहिजेत. कोणताही मंत्री जो सलग सहा महिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याचे मंत्रीपद आपोआप काढून घेतले जाते.
उतरत्या क्रमानुसार, मंत्रिमंडळाच्या पुढील प्रमाणे पाच श्रेण्या आहेत:
कलम ७५ नुसार, राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार काम करणाऱ्या मंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात.
भारतातील प्रत्येक राज्य त्यांच्या मंत्रिपरिषदेद्वारे शासन करत असते. राज्य मंत्रिमंडळाचे नियम आणि कार्यपद्धती अनुच्छेद १६३, १६४ आणि १६७(सी) नुसार केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणे आहेत.
मार्च २०२० मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर राज्यात कार्यरत असलेल्या एका मंत्र्याला काढून टाकण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम १४२ अंतर्गत "संपूर्ण न्याय" करण्यासाठी प्रथमच आपल्या अधिकारांचा वापर केला.[३]
भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सध्या २१ कॅबिनेट तर २३ राज्यमंत्री आहेत.[४][५][६]
नाव | मंत्रालय | पक्ष |
---|---|---|
नरेंद्र मोदी | पंतप्रधान, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्री | |
अमित शाह | गृह मंत्री, सहकार मंत्रालय | |
राजनाथ सिंह | संरक्षण | |
निर्मला सीतारामन | अर्थ, कॉर्पोरेट कार्य, माहिती व प्रसारण मंत्री | |
धर्मेंद्र प्रधान | शिक्षण मंत्री, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री | |
भूपेंद्र यादव | पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, कामगार आणि रोजगार मंत्रालय | |
नितीन गडकरी | परिवहन, भूपृष्ठ वाहतूक व नौवहन | |
सुब्रह्मण्यम जयशंकर | परराष्ट्र | |
किरेन रिजीजू | कायदा आणि न्याय मंत्री | |
मुख्तार अब्बास नकवी | अल्पसंख्यांक मंत्री | |
महेंद्र नाथ पांडे | अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री | |
प्रल्हाद जोशी | संसदीय कामकाज मंत्री, खाण मंत्रालय | |
गजेंद्र सिंह शेखावत | जलशक्ती मंत्री | |
नारायण राणे | सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री | |
पुरुषोत्तम रूपाला | पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री | |
अश्विनी वैष्णव | रेल्वे मंत्री, दळणवळण मंत्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री | |
सर्बानंद सोनोवाल | बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री, आयुष मंत्रालय | |
गिरीराज सिंह | ग्रामविकास मंत्री, पंचायत राज मंत्री | |
ज्योतिरादित्य सिंधिया | नागरी विमान वाहतूक मंत्री | |
रामचंद्र प्रसाद सिंह | पोलाद मंत्री | |
पशुपती कुमार पारस | अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री | |
राज कुमार सिंह | उर्जा मंत्री, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री | |
हरदीप सिंह पुरी | पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री | |
जी. किशन रेड्डी | सांस्कृतिक मंत्री, पर्यटन मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री | |
अनुराग ठाकूर | माहिती आणि प्रसारण मंत्री, युवा कार्य आणि क्रीडा मंत्री | |
स्मृती इराणी | महिला आणि बालविकास मंत्री | |
मनसुख मंडविया | आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, रसायने आणि खते मंत्री | |
वीरेंद्र कुमार | सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार | |
अर्जुन मुंडा | आदिवासी व्यवहार मंत्री | |
नरेन्द्र सिंह तोमर | कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री | |
पियुष गोयल | वाणिज्य आणि उद्योग मंत्री, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.