बेल्जियम देशाची राजधानी व युरोपातील एक प्रमुख शहर From Wikipedia, the free encyclopedia
ब्रुसेल्स (फ्रेंच: Bruxelles, फ्रेंच उच्चार ; डच: Brussel, डच उच्चार ; जर्मन: Brüssel) ही बेल्जियम देशाची राजधानी व युरोपातील एक प्रमुख शहर आहे. ब्रसेल्स महानगर क्षेत्र हा बेल्जियममधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश असून १९ महापालिका ह्या क्षेत्रात मोडतात. बेल्जियमच्या फ्लांडर्स व वालोनी ह्या दोन प्रशासकीय प्रदेशांची मुख्यालये देखील ब्रुरसेल्समध्येच आहेत. युरोपची राजधानी[3] ह्या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या ब्रुरसेल्स शहराला युरोपियन संघाचे मुख्यालय असण्याचा मान मिळाला आहे, तसेच नाटो ह्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय ब्रसेल्समध्येच स्थित आहे. इतर अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांची मुख्यालये व कार्यालये ब्रुसेल्समध्ये आहेत.
ब्रुसेल्स Bruxelles (फ्रेंच) Brussel (डच) Brüssel (जर्मन) |
|||
बेल्जियम देशाची राजधानी | |||
|
|||
= ब्रुसेल्स शहराचे महानगर क्षेत्रामधील स्थान | |||
गुणक: 50°51′0″N 4°21′0″E |
|||
देश | बेल्जियम | ||
स्थापना वर्ष | इ.स. ९४९ | ||
क्षेत्रफळ | १६१.४ चौ. किमी (६२.३ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ४३ फूट (१३ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ११,२५,७२८ (३१ डिसेंबर २०१०)[1][2] | ||
- घनता | ६,९७५ /चौ. किमी (१८,०७० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
www.portail.irisnet.be |
ब्रुसेल्स महानगर क्षेत्रामध्ये शहरामध्ये एकूण १९ महापालिका आहेत ज्यांमध्ये ब्रसेल्स शहर ही मध्यवर्ती संस्था आहे. ही आकाराने व लोकसंख्येने सर्वात मोठी महापालिका आहे.
ब्रसेल्स शहरातील १९ प्रभाग |
|
ब्रुसेल्सचे वास्तुशास्त्र विविधरंगी असून येथे पारंपरिक व आधुनिक इमारतींचे मिश्रण आढळते. ग्रां प्लास (Grand Place, Grote Markt) हा ब्रुरसेल्स शहराच्या मध्यभागी असलेला भाग ब्रुसेल्समधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ असून ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. ग्रां प्लासच्या भोवताली अनेक जुन्या सरकारी इमारती आहेत. जुन्या काळात ग्रां प्लासचा वापर बाजार भरवण्यासाठी केला जात असे.
अॅटोमियम, शाही राजवाडा, सेंकांतनेर नावाचे मोठे उद्यान इत्यादी ब्रुसेल्समधील इतर उल्लेखनीय वास्तू आहेत. मानेकां पिस हा एका लहान मुलाचा लघवी करण्याच्या क्रियेतील पुतळा ही ब्रुसेल्समधील एक प्रसिद्ध स्थळखूण आहे.
२०१० सालच्या अखेरीस ब्रुसेल्स शहराची लोकसंख्या ११,२५,७२८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १८ लाख होती. ब्रसेल्समधील २५.५ टक्के रहिवासी मुस्लिम धर्मीय आहेत ज्यांपैकी मोरोक्को व आफ्रिकेतील इतर देशांमधून स्थलांतर केलेल्या लोकांचा समावेश आहे. बेल्जियमचे नागरिक नसलेल्या ब्रुसेल्सच्या रहिवाशांची संख्या १९६१ साली केवळ ७ टक्के होती परंतु हीच संख्या २००६ साली ५६ टक्के झाली.[4][5] ऐतिहासिक काळात संपूर्णपणे डच भाषिक असलेल्या ब्रसेल्समध्ये गेल्या अनेक दशकांपासून फ्रेंच भाषिक रहिवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. सध्या ब्रसेल्समधील ५७ टक्के लोक केवळ फ्रेंच भाषा बोलतात. ह्या भाषापरिवर्तनाला ब्रसेल्सचे फ्रेंचीकरण (इंग्लिश विकिपीडियावर) असे संबोधले जाते.
ब्रुसेल्सचे हवामान इतर युरोपीय शहरांप्रमाणे सागरी स्वरूपाचे आहे जेथे सौम्य तापमान व उच्च आर्द्रता आढळते. येथे वर्षातील सुमारे २०० दिवस पाऊस पडतो; हिमवर्षा क्वचितच होते.
ब्रुसेल्स साठी हवामान तपशील | |||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
महिना | जाने | फेब्रु | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टें | ऑक्टो | नोव्हें | डिसें | वर्ष |
सरासरी कमाल °से (°फॅ) | 5.6 (42.1) |
6.4 (43.5) |
9.9 (49.8) |
13.1 (55.6) |
17.7 (63.9) |
20.0 (68) |
22.4 (72.3) |
22.5 (72.5) |
18.7 (65.7) |
14.4 (57.9) |
9.1 (48.4) |
6.5 (43.7) |
13.9 (57) |
सरासरी किमान °से (°फॅ) | 0.7 (33.3) |
0.6 (33.1) |
2.9 (37.2) |
4.8 (40.6) |
8.9 (48) |
11.5 (52.7) |
13.6 (56.5) |
13.4 (56.1) |
10.8 (51.4) |
7.6 (45.7) |
3.7 (38.7) |
1.9 (35.4) |
6.7 (44.1) |
सरासरी वर्षाव मिमी (इंच) | 71 (2.8) |
53 (2.09) |
73 (2.87) |
54 (2.13) |
70 (2.76) |
78 (3.07) |
69 (2.72) |
64 (2.52) |
63 (2.48) |
68 (2.68) |
79 (3.11) |
79 (3.11) |
821 (32.32) |
सरासरी पर्जन्य दिवस | 13 | 10 | 13 | 11 | 11 | 11 | 10 | 9 | 10 | 10 | 13 | 13 | 134 |
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास | 59 | 77 | 114 | 159 | 191 | 188 | 201 | 190 | 143 | 113 | 66 | 45 | १,५४६ |
स्रोत: World Weather Information Service[6] |
ब्रुसेल्स युरोपातील व जगातील इतर देशांसोबत हवाई, रेल्वे व रस्तेमार्गांनी जोडले गेले आहे. ब्रसेल्स विमानतळ हा बेल्जियममधील सर्वात वर्दळीचा विमानतळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवतो. युरोस्टार ह्या रेल्वेने ब्रुसेल्स शहर लंडनसोबत तर टीजीव्हीच्या थालीज रेल्वेने पॅरिस व क्यॉल्न शहरांसोबत जोडलेले आहे. ब्रुसेल्स-दक्षिण हे ब्रुसेल्समधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. शहरी वाहतूकीसाठी ब्रसेल्स मेट्रो ही भुयारी जलद रेल्वे व विस्तृत जाळे असलेली बससेवा उपलब्ध आहे.
ब्रुसेल्सचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[7]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.