From Wikipedia, the free encyclopedia
विहार हे बौद्ध धर्मीयांचे प्रार्थनास्थळ म्हणजेच बौद्ध मंदिर आहे. विहारात बौद्ध भिक्खु-भिक्खुणी निवास करतात. पाली भाषेत विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भिक्खु वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. बौद्ध विहारास बौद्ध मठ सुद्धा म्हणले जाते.
बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा किंवा मुर्ती असते, बौद्ध अनुयायी भिक्खु व उपासक बुद्धांना वंदन करतात. बौद्ध विहार हे बौद्ध धम्मीय शिक्षणाचे केंद्र असते
श्रीलंका, चीन, थायलंड, तिबेट तसेच भारतातील सारनाथ , बुद्धगया येथील विहार प्रसिद्ध आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.