Remove ads
बीजिंग शहरातील प्रमुख विमानतळ From Wikipedia, the free encyclopedia
बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: KUL, आप्रविको: WMKK) हा चीन देशाच्या बीजिंग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१२ साली बीजिंग राजधानी विमानतळ आशिया खंडामधील सर्वात वर्दळीचा तर अटलांटाच्या हार्ट्सफील्ड-जॅक्सन खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ होता.
बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ 北京首都国际机场 | |||
---|---|---|---|
आहसंवि: PEK – आप्रविको: ZBAA – WMO: 54511 | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | बीजिंग | ||
हब | एर चायना चायना सदर्न एरलाइन्स हैनान एरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ११६ फू / ३५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 40°4′48″N 116°35′4″E | ||
सांख्यिकी (२०१९) | |||
एकूण प्रवासी | १०,३७,१२,३५५ | ||
जागतिक क्रमवारीमध्ये अत्यंत जलद गतीने वर चढणाऱ्या बीजिंग राजधानी विमानतळामध्ये २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांसाठी नवा टर्मिनल बांधला गेला. हा टर्मिनल दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलखालोखाल जगातील दुसरा सर्वात मोठा टर्मिनल आहे. सध्या बीजिंग राजधानी विमानतळ हा एर चायना व चायना सदर्न एरलाइन्स ह्या चीनमधील प्रमुख विमान कंपन्यांचा हब आहे. ह्या विमानतळावरील प्रचंड वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी चीन सरकारने २०१९ साली बीजिंग शहराच्या ५० किमी दक्षिणेस बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विमानतळ बांधला. हे दोन्ही विमानतळ बीजिंग शहरासोबत बीजिंग सबवेच्या विमानतळ मर्गिकेद्वारे जोडले गेले आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.