प्रभाकर पंडित (सप्टेंबर ३०, १९३३ - डिसेंबर २८, २००६) हे मराठी संगीतकार होते.
प्रभाकर पंडित | |
---|---|
जन्म नाव | प्रभाकर विश्वनाथ पंडित |
जन्म | सप्टेंबर ३०, १९३३ |
मृत्यू |
डिसेंबर २८, २००६ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र |
संगीत संगीत-अध्यापन व्हायोलिनवादन |
संगीत प्रकार |
चित्रपटसंगीत नाट्यसंगीत |
वाद्ये | व्हायोलिन |
प्रसिद्ध आल्बम | देवाचिये द्वारी |
पत्नी | अनुराधा पंडित |
अपत्ये | केदार पंडित |
प्रभाकर पंडित यांचा जन्म सप्टेंबर ३०, १९३३ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले. संगीतात कारकीर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे "मधुवंती व्हायोलिन विद्यालया"चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे ते काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाचे ते अभ्यागत व्याख्याते; तसेच परीक्षकही होते.
संगीत क्षेत्रात सुमारे ४५ वर्षे कार्यरत असलेल्या पंडितांनी ध्वनिफीती, चित्रपट, नाटक, संगीतिका, संगीत नाटक यांसाठी संगीत दिले.
डिसेंबर २८, २००६ रोजी त्यांचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या ध्वनिफितींमुळे (सुमारे तीनशे) प्रभाकर पंडित नावाजले गेले. याखेरीज दहा चित्रपट, वीस नाटके, संगीतिका, संगीत नाटके यांकरताही त्यांनी संगीत दिले. तसेच जाहिरातींच्या जिंगल्सचीही निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली.
त्यांनी संगीतबद्ध केलेल्या "देवाचिये द्वारी'या अजित कडकडे यांच्या आवाजातील ध्वनिफितीने अत्यंत दुर्मिळ अशा "डबल प्लॅटिनम डिस्क'चा बहुमान मिळवला होता. मंगेशकरांसह सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम ते स्वप्नील बांदोडकर पर्यंत सुमारे ७८ विविध गायकांचे आवाज त्यांनी आपल्या ध्वनिफितींच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीतप्रकार त्यांनी संगीतबद्ध केले. रंग ओलेत्या फुलांचे, मन हा मोगरा, अभंग प्रभात, वृंदावनी वेणु, छंद हा विठ्ठलाचा, भक्तिप्रकाश, झुकझुक गाडी, देव दयानिधी अशा अनेक ध्वनिफितींची उदाहरणे सांगता येतील. "सुगम संगीताचे सौंदर्य' या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले होते.
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.