पेरू
दक्षिण अमेरिका खंडातील एक देश From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
पेरूचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Perú, उच्चार ) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिले हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहे.
- पेरु ह्या फळासाठी पहा: पेरु (फळ)
Remove ads
प्रागैतिहासिक काळापासून ह्या प्रदेशावर स्थानिक [[आदिवासी]] वसाहती व इन्का साम्राज्याचे अधिपत्य होते. १६व्या शतकात क्रिस्तोफर कोलंबसने लॅटिन अमेरिकेचा शोध लावल्यानंतर स्पेनने इतर [[दक्षिण अमेरिकन]] प्रदेशांप्रमाणे येथे आपली वसाहत स्थापन केली. १८२१ साली पेरूला स्वातंत्र्य मिळाले.
सध्या पेरू हा एक लोकशाहीवादी विकसनशील देश असून येथील लोकसंख्या सुमारे २.९५ कोटी इतकी आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी, [[खाणकाम]] इत्यादी उद्योगांवर अवलंबून आहे.
Remove ads
इतिहास
नावाची व्युत्पत्ती
प्रागैतिहासिक कालखंड
स्पॅनिश कालखंड
भूगोल
१२,८५,२१६ चौरस किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या पेरू देशाच्या भौगोलिक रचनेमध्ये प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील रूक्ष व सपाट प्रदेश, आन्देस तसेच अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट जंगलांचा समावेश होतो. अॅमेझॉनचा उगम पेरूच्या दक्षिण भागातील नेव्हादो मिस्मी ह्या अँडीझमधील एका शिखरावर होतो. उकायाली व मारान्योन ह्या अॅमेझॉनच्या पेरूमधील प्रमुख उपनद्या आहेत. टिटिकाका हे दक्षिण अमेरिकेमधील सर्वात मोठे सरोवर देशाच्या आग्नेय भागात बोलिव्हियाच्या सीमेवर स्थित आहे. विषुववृत्ताच्या जवळ असून देखील पेरूमधील हवामान तीव्र नाही.
चतुःसीमा
पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिले हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत.
राजकीय विभाग
पेरू देश एकूण २५ प्रदेश व लिमा ह्या प्रांतामध्ये विभागला गेला आहे.
मोठी शहरे
सुमारे २.९५ कोटी (दक्षिण अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर) लोकसंख्या असलेल्या पेरू देशामधील ७५% जनता शहरांमध्ये राहते. लिमा, अरेकिपा, त्रुहियो, चिक्लायो ही येथील प्रमुख शहरे आहेत.
Remove ads
समाजव्यवस्था
वस्तीविभागणी
=धर्म
प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात.
शिक्षण
संस्कृती
राजकारण
अर्थतंत्र
संदर्भ
बाह्य दुवे
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads