पेनसिल्व्हेनिया

From Wikipedia, the free encyclopedia

पेनसिल्व्हेनिया
Remove ads

पेनसिल्व्हेनिया (इंग्लिश: Commonwealth of Pennsylvania) हे अमेरिकेच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. पेनसिल्व्हेनिया हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३३वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकाचे राज्य आहे.

जलद तथ्य
Remove ads

पेनसिल्व्हेनियाच्या उत्तरेला न्यू यॉर्क, वायव्येला ईरी सरोवर, पूर्वेला ओहायो, नैऋत्येला वेस्ट व्हर्जिनिया, दक्षिणेला मेरीलॅंड, आग्नेयेला डेलावेर तर पूर्वेला न्यू जर्सी ही राज्ये आहेत. हॅरिसबर्ग ही पेनसिल्व्हेनियाची राजधानी असून फिलाडेल्फिया हे सर्वात मोठे शहर आहे. पिट्सबर्ग, ॲलनटाऊनईरी ही येथील इतर मोठी शहरे आहेत.

सुमारे ५०० वर्षांचा इतिहास असलेले पेनसिल्व्हेनिया आर्थिक, औद्योगिक व राजकीयदृष्ट्या अमेरिकेतील एक महत्त्वाचे राज्य मानले जाते. अमेरिकेच्या संघात सामील होणारे पेनसिल्व्हेनिया हे दुसरे राज्य होते (पहिले: डेलावेर). वॉशिंग्टन डी.सी. बांधले जाण्याआधी १७९० ते १८०० ह्या दरम्यान फिलाडेल्फिया ही अमेरिकेची राजधानी होती. पेनसिल्व्हानिया अमेरिकेच्या सर्वात पुढारलेल्या औद्योगिक क्षेत्रामधील एक राज्य आहे. ह्या राज्याचा जीडीपी अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

Remove ads

गॅलरी

बाह्य दुवे

जलद तथ्य
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads