वैजनाथ मंदिर

From Wikipedia, the free encyclopedia

वैजनाथ मंदिर
Remove ads
Remove ads

परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी शहर हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते. तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे.

अधिक माहिती नाव:, जीर्णोद्धारक: ...

परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात.

पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.

जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे. सरस्वती नदी (परळी वैजनाथ) परळी शहरातील जुन्या गावभागातून पौराणिक महत्व असलेली पुरातन सरस्वती नदी वहाते. या नदीची भाविक मनोभावे पूजा सुद्धा करीत असतात. परळी जवळच ब्रम्हगंगा, वेणूमती व परळीतून वाहणाऱ्या सरस्वती नदी या तिन्ही नदीचा संगम होतो. यामुळे तेथील गावाला संगम हे नाव सुद्धा पडले आहे. कालपरत्वे बारमाही वाहणारी नदी पावसाळयाच्या काळात चार-पाच महिने अजून सुद्धा वहात असते. या नदीचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथात सापडतो. परळी महात्म्य या ग्रंथात सरस्वती नदी बद्दल पौराणिक कथा आहे. परळीची गंगा नदी म्हणजे महात्म्यात उल्लेखलेली सरस्वती गंगा नदी हिला लेंडी असेही म्हणतात जुने परळी गाव आणि वैद्यनाथ मंदिर यांच्यामधून ही नदी वाहते पावसाब्यात या नदीला भरपूर पाणी असे. पूर्वी बारा महिने खूप पाणी होते. एकदा याच सरस्वती नदीला खूप मोठापूर आला होता. गणेशाच्या ही गोष्ट लक्षात आली. या गणपतीने साद घातली आणि ओरडून वैद्यनाथाला सांगितले, देवा, हा प्रवाह असाच राहिला तर आपल्या महात्म्याला बाधा येईल. भक्तांना दर्शनाला येता येणार नाही. त्यामुळे या नदीला आवरा. साद घालणाऱ्या गणेशाची मूर्ती याची साक्ष पटवून देते. या मूर्तीचे वैशिष्ट्ये तिचा उजवा हात तोंडावर पालथा ठेवलेला आहे. श्री संत जगमित्र नागाच्या समाधी जवळ मंदिराच्या तटबंदित ही मुर्ती पाहावयास मिळते. मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ पूर्वाभिमुख अशी ही मूर्ती आहे.

कालानुरूप परळी वैजनाथ येथील सरस्वती नदीवर अनेक अतिक्रमणे झाल्याने नदीच्या पात्राची रुंदी कमी झाली आहे. याविरोधात अश्विन मोगरकर आपल्या सहकाऱ्यांसह नदीचे पुनर्जीवन व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. सरस्वती नदीचे रुंदीकरण, खोलीकरण व्हावे. सरस्वती नदी पुन्हा मूळ स्वरूपात व्हावी यासाठी अश्विन मोगरकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

परळी तालुक्यातील श्री पापदंडेश्वर मंदिर गाढे पिंपळगाव एक ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे, या गावात १२ व्या शतकातील शिवमंदिर आहे, १२ व्या शतकातील यादव राजाच्या कालखंडात बीड जिल्ह्यातील काही गावामध्ये यादव सम्राटांनी शिवभक्तांसाठी ठिकठिकाणी शिवमंदिर बांधलेली आहेत, आपला स्थापत्यकार हेमाड या कलेमध्ये अत्यंत हुशार होता म्हणून त्याच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली होती. बीड, आंबेजोगाई, परळी बरोबरच ग्रामीण भागात नागापूर, तपोवन,गाढे पिंपळगाव, धर्मापुरी याठिकाणी अशी महादेवाची मंदिरे बांधन्यात आलेली आहेत, हेमाड ने जेवढी मंदिरे बांधली आहेत तेवढी त्याच्याच नावाने ओळखली जातात म्हणजे 'हेमाडपंथी' अशी ओळखली जातात. ही मंदिरे स्थापत्य कलेचा अत्यंत उत्कृष्ट नमुना आहेत, या काळातीलच श्री. पापदंडेश्वराचे हेमाडपंथी मंदिर पिंपळगाव गाढे येथे आहे या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रवेशदारावर मध्यभागी भलीमोठी दगडाची शिळा आहे, पूर्वी गावातील लोक दर्शनासाठी जाताना शिळेखालून मंदिरात प्रवेश करत असत म्हणजे पुर्णपणे दंडवत घालूनच आतमध्ये प्रवेश करता ऐत होता म्हणून या महादेवाला पापदंडेश्वर असे नाव पडल्याचे सांगितले जाते ,आता मात्र गावातील लोक शिळेवर चढून आत जात आहेत, या मंदिरात दरवर्षी चैत्र महिन्यात सप्ताहाचे आयोजन केले जाते, या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पापदंडेश्वराची पालखी काढली जाते दोन दिवस हा पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यासाठी पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात तसेच पंचमीला पण दरवर्षी सप्ताहाचे आयोजन केले जाते, श्रावण महिन्यात शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होवून गर्दी करत असतात, यावर्षी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे, या मंदिराच्या सभामंडपाचा मागील तीन वर्षा पुर्वी गावकऱ्यांनी लोक सहभागातून जवळपास ३० लक्ष रुपये खर्च करून काम पुर्ण केले आहे, आणखी या मंदिराचे बरेचसे काम बाकी आहे, गावकऱ्यांची अनेक दिवसांपासून ची मागणी आहे की या मंदिराचा समावेश तिर्थक्षेत्र विकास योजनेत करावा, या प्राचीन काळातील स्थापत्यकलेचा ठेवा जतन करावा अशी मागणी होत आहे.

कसे याल? परळी वैजनाथ हून बसने येता येते. तसेच परळी बीड राज्य रस्त्यावर गाढे पिंपळगाव पाटीवर उतरून दोन किलोमीटर अंतरावर पायीकिंवा अँटोने जावे लागते. सिरसाळा येथून आठ किलोमीटर आहे. येथून अँटोने जाण्याची व्यवस्था आहे.

Remove ads

आणखी एक वैजनाथ

भारताच्या झारखंड राज्यातल्या संथाल परगण्यामधील देवघर गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे. यालाही (बाबा बैजनाथ) किंवा वैद्यनाथ म्हणले जाते. हेही बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे, अशी मान्यता आहे. रावण लंकेजवळ जाताना दिशेप्रमाने प्रवास-क्रमवारीनुसार महाराष्ट्रतील परळी हेच मुख्य व खरे १२ ज्योतिर्लिंगांतले एक आहे, हे सिद्ध होते.

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads