Remove ads
भारतातील एक राज्य. From Wikipedia, the free encyclopedia
नागालॅंड उच्चार (सहाय्य·माहिती) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. या राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. हे राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले आहे. नागालॅंड राज्याचे क्षेत्रफळ १६,५७९ चौ.किमी असून लोकसंख्या १९,८०,६०२ एवढी आहे. कोहिमा ही नागालॅंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ॲंगमी व चॅंग ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. शेती, हातमाग व विणकाम हे नागालॅंडमधील प्रमुख उद्योग आहेत. तांदूळ, डाळ, ऊस व कापूस ही येथील प्रमुख पिके आहेत. या राज्याची साक्षरता ८०.११ टक्के एवढी आहे.
?नागालँड भारत | |
— राज्य — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १६,५७९ चौ. किमी |
राजधानी | कोहिमा |
मोठे शहर | दीमापुर |
जिल्हे | ८ |
लोकसंख्या • घनता |
१९,८८,६३६ (24th) • १२०/किमी२ |
भाषा | इंग्रजी |
राज्यपाल | निखिल कुमार |
मुख्यमंत्री | नैफीउ रीयो |
स्थापित | १ डिसेंबर इ.स. १९६३ |
विधानसभा (जागा) | नागालँड विधानसभा (60) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-NL |
संकेतस्थळ: Nagaland.nic.in |
नागभूमीत राहणाऱ्यांना किरात म्हणले जाई.. नाग ही एकच जनजाती नाही. अंगामी, आअ, कुबई, कचा, लेंगमी, कोन्याक, रेंगमा, जेलियांग अशा साऱ्या किरातांना 'नाग' ही सामान्य संज्ञा आहे. नाग हे त्यांचेचंद्रकुलचिन्ह आहे. या जनजातीचा प्रमुख देव सूर्य आहे. तसेच प्रत्येक जनजातीचे देव आहेत. अंगामी नागांचा देव उकपेनुअकाई- तर आअंचा देव पाषाणस्वरूप आणि तोच त्यांचा मूळ पुरुष. रेंगमाच्या दृष्टीने सूर्य पुरुष आहे तर [[]] हा देवी आहे. नागकन्यांचे आकर्षण रामायण काळातही होते असे दिसून येते. श्रीरामाचा पुत्र कुशाचा विवाह नागकन्येशी झाला होता. रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद याची पत्नी नागभूमीची होती, तर. उलुपी ही अर्जुनाची पत्नी नागकन्या होती.
यावरील विस्तृत लेख पहा - नागालॅंडमधील जिल्हे
नागालॅंड राज्यात एकूण ८ जिल्हे आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.