Remove ads
राज्य आणि माओवादी यांच्यात भारतात सशस्त्र संघर्ष From Wikipedia, the free encyclopedia
नक्षलवाद ही भारतातील कडव्या साम्यवादी संघटनांनी चालविलेली सशस्त्र चळवळ आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गरीब शेतमजूर आणि आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओ ने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे.[1]
पश्चिम बंगाल राज्यातील नक्षलबारी गावात 'सोनम वांगडी' या पोलीस निरीक्षकाचा एका आदिवासी तरुणाच्या तीर कामठ्याने मृत्यू झाला होता, ज्याचे पर्यवसान आसाम फ्रंटियर रॅफल्सकडून जमावावर गोळीबार करण्यात झाले. मे २५, १९६७ रोजी घडलेल्या या घटनेत ७ महिला व ४ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट संघटनेने स्थानिक आदिवासींच्या मदतीने पश्चिम बंगाल सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव केला.[2] मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे झालेले विभाजन व माओवादी तसेच लेनिनवादी गट बाहेर पडल्यानंतर उद्भवलेल्या संघर्षात देखील नक्षलवादाचे मूळ आहे असे मानले जाते.[3] चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांनी त्या उठावाचे नेतृत्व केले होते. मुजुमदारांनी १९६९ साली चळवळीची राजकीय आघाडी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट)ची स्थापना केली.
सध्या (जानेवारी २०१०) नक्षलवादी गट व समविचारी संघटना (उदा. आंध्रप्रदेशातील 'पीपल्स वॉर ग्रुप') भारताच्या वीस राज्यांतील २२० जिल्ह्यांत कार्यरत असून[4] त्यांच्या कारवाया भारताच्या आदिवासीबहूल 'लाल पट्ट्यात' केंद्रित झाल्या आहेत.[5]
भारतीय गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार देशात वीस हजार सशस्त्र नक्षलवादी व पन्नास हजार सक्रिय कार्यकर्ते असून त्यांचे लक्षावधी समर्थक आहेत.[6]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.