धीरज देशमुख
भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
धीरज विलासराव देशमुख (जन्म : ६ एप्रिल १९८०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे ते पुत्र आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघद्वारे महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवडले आहेत.[१][२]. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये ते १,२१,४८२ मतांच्या अंतराने जिंकले. हे तिसरे सर्वाधिक अंतर ठरले. ६ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
धिरज देशमुख | |
महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य | |
मागील | त्र्यंबकराव भिसे |
---|---|
मतदारसंघ | लातूर ग्रामीण |
जन्म | ६ एप्रिल, १९८० बाभळगाव, लातूर, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
आई | वैशाली देशमुख |
वडील | विलासराव देशमुख |
पत्नी | दिपशिखा देशमुख |
नाते | अमित देशमुख (भाऊ), रितेश देशमुख (भाऊ), जेनेलिया डिसूझा (वहिनी) |
अपत्ये | वंश, दिवियाना |
निवास | बाभुळगांव, ता.जि. लातूर |
व्यवसाय | राजकारणी |
धर्म | हिंदू |
पूर्वीचे जीवन
धीरज देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे तिसरे सुपुत्र आहेत, तसेच माजी मंत्री मा. दिलीपराव देेशमुख यांचे पुतणे, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. अमित देशमुख व प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांचे बंधू आहेत.[३]
राजकीय कारकीर्द
- २००४ पासून काँग्रेस पक्ष प्रचारात सक्रीय सहभाग
- २००९ पासून युवक काँग्रेसमध्ये सहभागी
- सदस्य, जिल्हा परिषद, लातूर
- आमदार, लातूर ग्रामीण मतदारसंघ
- सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
- अध्यक्ष, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
वैयक्तिक जीवन
दीपशिखा देशमुख यांच्याशी ते विवाहबद्ध आहेत. त्यांना वंश आणि दिवियाना ही दोन अपत्य आहेत.
भूषवलेली पदे
- २०१४ : लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष
- २०१७-२०१९ : जिल्हा परिषद लातूरचे सदस्य
- २०१७ : बाभळगाव येथील दयानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
- २०१९ : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
- २०२० : राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य
- २०२० : राज्य सरकारच्या मराठी भाषा समितीचे सदस्य
- २०२० : राज्य सरकारच्या अंदाज समितीचे सदस्य
- २०२० : राज्य सरकारच्या धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीचे सदस्य
- २०२० : मांजरा परिवारातील रेणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक
- २०२१ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस
- २०२१ : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष
हे सुद्धा पहा
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.