ब्राझीलच्या राष्ट्रपती From Wikipedia, the free encyclopedia
दिल्मा व्हाना रूसेफ (पोर्तुगीज: Dilma Vana Rousseff) (जन्म: १४ डिसेंबर १९४७) ह्या ब्राझिल देशाच्या ३६व्या व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. गतराष्ट्राध्यक्ष लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा ह्याच्या मंत्रीमंडळामध्ये प्रमुख सचिव राहिलेल्या रूसेफ ब्राझीलच्या पहिल्याच महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. ऑक्टोबर २०१० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये त्या ५६ टक्के मते मिळवून राष्ट्राध्यक्षपदावर आल्या व ऑक्टोबर २०१४ मधील चुरशीच्या निवडणुकीमध्ये अत्यंत कमी मताधिक्याने विजय मिळवून त्यांनी सत्ता राखली.
दिल्मा रूसेफ Dilma Rousseff | |
विद्यमान | |
पदग्रहण जानेवारी १ इ.स. २०११ निलंबित: १२ मे २०१६ पासून | |
मागील | लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा |
---|---|
अध्यक्षीय स्टाफ प्रमुख | |
कार्यकाळ २१ जून २००५ – ३१ मार्च २०१० | |
राष्ट्रपती | लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा |
खाण व उर्जा मंत्री | |
कार्यकाळ १ जानेवारी इ.स. २००३ – २१ जून इ.स. २००५ | |
राष्ट्रपती | लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा |
जन्म | १४ डिसेंबर, १९४७ बेलो होरिझोन्ते, मिनास जेराईस, ब्राझील |
सही | |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
बल्गेरियामधून स्थलांतर केलेल्या कुटुंबामधून आलेली रूसेफ अर्थतज्ज्ञ असून देशातील इ.स. १९८५ पूर्वीच्या हुकुमशाहीविरोधातील बंडखोरीमध्येही तिने सहभाग घेतला होता. मावळता लोकप्रिय अध्यक्ष लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा ह्याने रूसेफची राजकीय वारसदार म्हणून निवड करून निवडणुकीमध्ये तिला पाठिंबा दिला होता.
रूसेफ ब्राझीलमध्ये लोकप्रिय असून तिच्या ब्राझीलमधील पायाभुत सुविधा सुधारण्याच्या प्रयत्नांचे कौतुक झाले आहे. जर्मनीची चान्सेलर आंगेला मेर्कल व माजी अमेरिकन परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन ह्यांच्या समवेत रूसेफचा जगातील बलाढ्य व लोकप्रिय महिला नेत्यांमध्ये उल्लेख केला जातो.
२०१५ साली ब्राझीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचार चौकशीत रूसेफ ह्यांनी आपल्या पदाचा अवैध वापर करून राष्ट्रीय अर्थसंकल्पातील तूट कमी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. ह्याबद्दल रूसेफ ह्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर खटला भरण्याचा निर्णय ब्राझीलच्या संसदेने घेतला. १२ मे २०१६ रोजी संसदेमध्ये झालेल्या मतप्रदर्शनात ५५-२२ ह्या संख्येने संसदेने रूसेफला निलंबित करून खटला भरण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार रूसेफच्या जागेवर उपराष्ट्राध्यक्ष मिशेल तेमेर हे कार्यवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून काम सांभाळतील.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.