From Wikipedia, the free encyclopedia
तुलागी (लेखनभेद:तुलाघी) हे प्रशांत महासागरातील सॉलोमन द्वीपसमूहातील एक छोटे बेट आहे. हे बेट फ्लोरिडा द्वीपाच्या दक्षिणेस आहे.
तुलागी Tulagi |
|
सॉलोमन द्वीपसमूहमधील शहर | |
तुलागीचे सॉलोमन द्वीपसमूहमधील स्थान | |
गुणक: 09°06′S 160°09′E |
|
देश | सॉलोमन द्वीपसमूह |
राज्य | मध्य प्रांत (सॉलोमन द्वीपसमूह) |
क्षेत्रफळ | ५.५ चौ. किमी (२.१ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | १,७५० |
या बेटाचे क्षेत्रफळ ५.५ किमी२ असून १,७५० व्यक्ती येथे राहतात. या बेटावरील शहराचे नावही तुलागी असेच आहे.
हे शहर इ.स. १८९६ ते इ.स. १९४२ पर्यंत सॉलोमन द्वीपसमूहाची राजधानी होते.
दुसऱ्या महायुद्धा दरम्यान ब्रिटिश आधिपत्याखालील या शहरावर जपानी आरमार व सैन्याने मे ३, इ.स. १९४२ रोजी हल्ला करून जवळ समुद्री विमानांचा तळ उभारण्याच्या मनसूब्यानिशी शहर ताब्यात घेतले. पुढील दिवशी यु.एस.एस. यॉर्कटाउन या अमेरिकन विमानवाहू नौकेवरील विमानांनी येथील बंदरावर हल्ला केला. हा हल्ला म्हणजे कॉरल समुद्राच्या लढाईची नांदीच होती.
साधारण तीन महिन्यांनी ऑगस्ट ७ रोजी अमेरिकेच्या मरीन सैन्याने ऑपरेशन वॉचटॉवर या मोहीमेंतर्गत तुलागी परत मिळवले. यानंतर येथे अमेरिकेच्या लढाऊ होड्यांचा तळ होता. जॉन एफ. केनेडी ज्यावर होता ती पी.टी.-१०९ ही लढाऊ होडी ही येथे तैनात होती. युद्धादरम्यान येथे २० खाटांचा दवाखाना सुरू केला गेला जो १९४६ पर्यंत कार्यरत होता.
गेल्या काही दशकांत तुलागीत स्कुबा डायव्हिंगसाठीच्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथे बुडालेल्या यु.एस.एस. एरन वॉर्ड, यु.एस.एस. कनाव्हा आणि एच.एस.एन.झेड.एस. मोआ या जहाजांच्या सानिध्यात येथे अनेक प्रकारच्या वनस्पती व मासे आहेत. एरन वॉर्ड पाण्याखाली ७० मीटर आहे तर इतर जहाजे त्याहून कमी खोलीत बुडलेल्या आहेत.
सॉलोमन द्वीपसमूहातील अलीकडील अशांत वातावरणामुळे हा उद्योगधंदा धोक्यात आला आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.