From Wikipedia, the free encyclopedia
डॉमिनिका हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. हा देश कॅरिबियन समुद्रामध्ये ग्वादेलोपच्या दक्षिणेस व मार्टिनिकच्या उत्तरेस ७५० चौरस किमी क्षेत्रफळाच्या बेटावर वसला असून २००१ साली येथील लोकसंख्या केवळ ७१,२९३ इतकी होती. रुसाउ ही डॉमिनिकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
डॉमिनिका Commonwealth of Dominica डॉमिनिकाचे राष्ट्रकुल | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "Après Bondie, C'est La Ter" (ॲंटिलियन क्रियोल) "Après le Bon Dieu, c'est la Terre" (फ्रेंच) | |||||
राष्ट्रगीत: Isle of Beauty, Isle of Splendour | |||||
डॉमिनिकाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
रुसाउ | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||
इतर प्रमुख भाषा | फ्रेंच | ||||
सरकार | सांसदीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | एल्युड विल्यम्स | ||||
- पंतप्रधान | रूझवेल्ट स्केरिट | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ३ नोव्हेंबर १९७८ (युनायटेड किंग्डमपासून) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ७५० किमी२ (१८४वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.६ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ७१,२९३ (१९५वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १०५/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ९७.७ कोटी अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १३,८१५ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७२४ (उच्च) (७३ वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | पूर्व कॅरिबियन डॉलर | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | अटलांटिक प्रमाणवेळ (यूटीसी - ४:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | DM | ||||
आंतरजाल प्रत्यय | .dm | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | १-७६७ | ||||
क्रिस्तोफर कोलंबसने हे बेट ३ नोव्हेंबर १४९२ रोजी शोधुन काढले व त्याला ह्या दिवसाचे (रविवार, लॅटिनमध्ये: dominica) नाव दिले. त्यानंतर अनेक शतके येथे फारशी वस्ती नव्हती. फ्रान्सने १७६३ साली हे बेट ब्रिटनच्या स्वाधीन केले. ब्रिटनने येथे एक छोटी वसाहत स्थापन केली. ३ नोव्हेंबर १९७८ रोजी डॉमिनिकाला स्वातंत्र्य मिळाले. सध्या डॉमिनिका राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे सांसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. ह्या भागातील प्रजासत्ताक असणाऱ्या कमी देशांपैकी डॉमिनिका एक आहे.
येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटन हा डोमिनिकामधील सर्वात मोठा उद्योग आहे. येथील दरडोई उत्पन्न कॅरिबियनमधील इतर देशांच्या तुलनेत बरेच कमी आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.