डहाणू विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. From Wikipedia, the free encyclopedia
डहाणू विधानसभा मतदारसंघ - १२८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार डहाणू मतदारसंघात पालघर जिल्ह्यातील १. तळासरी तालुका आणि २. डहाणू तालुक्यातील सायवान, मल्याण, डहाणू ही महसूल मंडळे आणि डहाणू नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. डहाणू हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे विनोद भिवा निकोले हे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | विनोद भिवा निकोले | भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) | |
२०१४ | पास्कल जान्या धनरे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | राजाराम नथू ओझरे | भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
डहाणू | ||
उमेदवार | पक्ष | मत |
ओझरे राजाराम नाथु | माकप | ६२५३० |
कृष्णा अर्जुन घोडा | राष्ट्रवादी | ४६३५० |
ईश्वर किसन धोडी | शिवसेना | १७९५५ |
विनोद बेंड्या शिंदा | बसपा | ५४१२ |
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
विजयी
- पास्कल धनागरे - भारतीय जनता पक्ष
संदर्भ
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.