जोमार्ड खाडी दक्षिण प्रशांत महासागरातील कॉरल समुद्र आणि सॉलोमन समुद्राला जोडणारी खाडी आहे. याच्या एका बाजूस पापुआ न्यू गिनीची मुख्य भूमी तर दुसऱ्या बाजूस लुईझिएड द्वीपसमूह आहेत. दुसऱ्या महायुद्धात जपानने पोर्ट मोरेस्बीवर चढाई करण्यासाठी या मार्गाचा उपयोग केला परंतु दोस्त राष्ट्रांनी कॉरल समुद्राच्या लढाईत त्यांना थोपवून धरले.

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.